Girish Mahajan : शिवसेनेतील आमदारांच्या बंडाला उद्धव ठाकरेच जबाबदार; गिरीश महाजन यांचा दावा

Girish Mahajan : नव्या सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. त्यावरही महाजन यांनी उत्तर दिलं आहे. वारंवार स्थगिती सरकार म्हणून शिंदे- भाजप सरकारचा उल्लेख केला जात आहे.

Girish Mahajan : शिवसेनेतील आमदारांच्या बंडाला उद्धव ठाकरेच जबाबदार; गिरीश महाजन यांचा दावा
पंकजा मुंडे यांना मोठं पदImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 4:03 PM

नंदूरबार: शिवसेनेतील (shivsena) झालेल्या फुटीला दुसरं तिसरं कोणी जबाबदार नसून स्वत: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच (uddhav thackeray) जबाबदार आहेत, असा दावा भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केला आहे. राज्यातील राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. कालपर्यंत निष्ठावंत असलेले शिवसैनिक आज शिंदे गटात सामील होत आहेत. याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांना आपल्या आमदार, खासदारांना न्याय देता आला नाही. त्यामुळेच सर्व आमदार, खासदार त्यांना सोडून शिंदें सोबत जोडले गेलेले आहेत. मात्र शिवसेनेचे काही मंडळी यात भाजपाचा हात असल्याचा वारंवार आरोप करत आहे. मात्र याला भाजप जबाबदार नाही. हे सर्व तुमचं अपयश आहे. स्वतःच अपयश लपवण्यासाठी वारंवार भाजपाचे नाव घेत आहेत. मात्र, त्यात काडीचंही तथ्य नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. गिरीश महाजन हे मीडियाशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे यांनी काल शाखा उद्घाटनाच्या वेळी येत्या निवडणुकांमध्ये पैसा आणि निष्ठावान अशी लढत होणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचाही महाजन यांनी समाचार घेतला. सर्व निष्ठावंत एकनाथ शिंदें सोबत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांवर भाजपाच्या झेंडा फडकवल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

सर्वांना समान निधी मिळणार

नव्या सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. त्यावरही महाजन यांनी उत्तर दिलं आहे. वारंवार स्थगिती सरकार म्हणून शिंदे- भाजप सरकारचा उल्लेख केला जात आहे. मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत नव्हतं. तरीही त्यांनी काही निर्णय घेतले. अल्पमतातील सरकार निर्णय घेऊ शकत नाहीत. ते सर्व एकतर्फी निर्णय होते. केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समोर ठेवून हे निर्णय दिले गेले होते. निधीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच अधिक मिळाला होता. णात्र, आता सर्वांना समान निधी दिला जाणरा आहे. या सरकारमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. मात्र कोणाला किती मंत्रिपद द्यायचे. याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ नेते मंडळी घेणार आहेत. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.