Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : आता शिवसेनेने आशा सोडली, ज्यांना मतदारसंघात जायचे त्यांनी जावं; सेनेचं अखेर आमदारांना फर्मान

Eknath Shinde : शिवसेनेकडे एकूण 55 आमदार होते. या आमदारांमध्ये आपल्याच नेतृत्वाविरोधात खदखद होती. मुख्यमंत्री कुणालाच भेटत नसल्याचा या आमदारांचा दावा होता. त्यामुळे हे आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज होते.

Eknath Shinde : आता शिवसेनेने आशा सोडली, ज्यांना मतदारसंघात जायचे त्यांनी जावं; सेनेचं अखेर आमदारांना फर्मान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 11:36 AM

मुंबई: गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेलं आमदारांचं बंड काही थांबता थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एक एक करून आमदार गुवाहाटीला जाऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना जाऊन भेटत आहेत. आता पर्यंत शिंदे यांच्याकडे 41 आमदार एकवटले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (cm uddhav thackeray) अवघे 14 आमदार उरले आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही (shivsena) आता आशा सोडली आहे. शिवसेनेने हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांना बंधनमुक्त केले आहे. तुम्हाला तुमच्या मतदारसंघात जायचे असेल तर जा, असं फर्मानच शिवसेनेने आपल्या आमदारांना सोडल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे बंधनमुक्त झालेले आमदार आपल्या मतदारसंघात जातात की थेट गुवाहाटी गाठतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, हॉटेलमध्ये असलेल्या काही आमदारांनी गुवाहाटी गाठत शिंदे यांच्या गटात सामिल होणं पसंत केलं आहे.

शिवसेनेकडे एकूण 55 आमदार होते. या आमदारांमध्ये आपल्याच नेतृत्वाविरोधात खदखद होती. मुख्यमंत्री कुणालाच भेटत नसल्याचा या आमदारांचा दावा होता. त्यामुळे हे आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज होते. विधान परिषद निवडणुकीनंतर हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले. शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला 13 आमदार होते. नंतर हा आकडा वाढून 22 आणि नंतर 35 झाला. शिंदे यांच्या बंडानंतरही शिवसेनेसोबत काही आमदार होते. गुलाबराव पाटील, सदा सरवणकर, दीपक केसरकर, सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे आमदारही शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेना अधिकच कमकुवत झाली आहे.

हे सुद्धा वाचा

म्हणून निर्णय

अधिक फूट पडू नये म्हणून ज्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. ते आमदारही काहीना काही बहाणा करून शिंदे यांना जाऊन मिळत आहेत. गुलाबराव पाटील यांनी तर आजारी असल्याचा बहाणा केला. जळगावला जात असल्याचं सांगितलं. ते जळगावलाही गेले. नंतर तिथून त्यांनी थेट गुवाहाटीला गेले. त्यामुळे आपले आमदार आता आपल्या हातात राहिले नाहीत हे ठाकरे यांच्या लक्षात आले. शिवाय ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून आता सत्तेत राहायचं नाही असं ठरवूनच टाकलं आहे. त्यामुळेही त्यांनी आमदारांना मतदारसंघात जायचं असेल तर जा, असा निरोप धाडल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ठाकरेंकडे उरलेले आमदार

आदित्य ठाकरे अजय चौधरी सुनिल प्रभू रविंद्र वायकर संजय पोतनीस सुनिल राऊत प्रकाश फातर्पेकर रमेश कोरगावकर दिलीप लांडे राजन साळवी उदय सामंत वैभव नाईक अंबादास दानवे नितीन देशमुख (रिटर्न) कैलास पाटील (रिटर्न) भास्कर जाधव

आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.