Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul election 2021 : गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता? मतदानाकडे राज्याचं लक्ष

Gokul election voting live : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळसाठी (Kolhapur Gokul Doodh Sangh Election) आज मतदान होत आहे.

Gokul election 2021 : गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता? मतदानाकडे राज्याचं लक्ष
कोल्हापूर गोकुळ दूधसंघ
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 7:53 AM

Gokul election 2021 कोल्हापूर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळसाठी (Kolhapur Gokul Doodh Sangh Election) आज मतदान होत आहे. या निवडणुकीत 21 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत.या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज पेट्यांमध्ये बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाल्याने आज 3647 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) असा सामना या निवडणुकीनिमित्ताने होत आहे. (Gokul election 2021 Kolhapur Dudh Sangh voting live today Mahadevrao Mahadik vs Satej Patil Hasan Mushrif maharashtra Gokul election )

या निवडणुकीत सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान दिलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यात गोकुळचे कार्यक्षेत्र आहे. या निवडणुकीत 3656 एकूण मतदार असून त्यापैकी 3 जण मयत आहेत. 70 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी 385 शासकीय कर्मचारी मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. कोरोना बाधित मतदारांना पीपीई किट घालून मतदान करता येणार आहे.

यंत्रणा सज्ज

गोकुळ निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. रमणमळा येथील शासकीय गोदामात मतपेट्या तसंच मतपत्रिकांच वाटप काल निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. आज जिल्ह्यातील 35 मतदान केंद्रांवर 70 बूथवर ही मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने काल साहित्य नेण्यासाठी फक्त तालुक्यातील तहसीलदार यांना बोलावण्यात आलं होतं. त्याचबरोबर मतदान केंद्रावर देखील आरोग्य कर्मचारी तसेच कोरोना नियमांचं पालन करूनच ही मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.

कोर्टाकडून शिक्कामोर्तब

गोकुळ दूधसंघातील सत्तारुढ गटाने निवडणुकीला स्थगिती देण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राज्य सरकारला 26 एप्रिलपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने गोकुळ दूधसंघाची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट केलं.

गोकुळ दूधसंघाची निवडणूक (Kolhapur Gokul Doodh Sangh Election) होणार असल्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं. निवडणुकीला स्थगिती देण्याबाबत सत्ताधारी गटाने केलेली याचिका कोर्टात फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत गोकुळ दूधसंघाची निवडणूक घेण्यास ग्रीन सिग्नल दिला.

गोकुळ निवडणुकीचा उत्साह शिगेला

गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून सत्ताधारी महाडिक गटाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केलीय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली. मात्र अवघ्या चार दिवसात त्यात फूट पडली. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी स्पष्ट केलं.

गोकुळ दूध संघ का आहे महत्त्वाचा?

दूध संघाचा जिल्ह्यात आणि राज्यात लौकिक

रोज 30 ते 35 लाख लिटर दुधाचं संकलन

मुंबई पुण्यासह अनेक मोठ्या शहरात गोकुळ दुधाला मागणी

गोकुळची रोजची कोट्यवधीची उलाढाल

गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघात

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

2 मे – मतदान 4 मे – मतमोजणी

संबंधित बातम्या : 

Gokul Election | गोकुळ दूधसंघाची निवडणूक होणारच, सत्ताधाऱ्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं, 2 मे रोजी मतदान

सत्ताधारी गटातील संचालक विरोधकांच्या गळाला, गोकुळ दूध संघ निवडणुकीत चुरस

टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.