रवी राणा यांचं ‘ते’ विधान गमतीनं घ्या -सुधीर मुनगंटीवार
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यावर एक विधान केलंय. पाहा...
शाहिद पठाण, गोंदिया : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यावर एक विधान केलंय. रवी राणा यांच्या वक्तव्याला गंमतीने घ्या, असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. शिंदेगटाच्या बंडानंतर, तसंच अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. त्यावर रवी राणांनी (Ravi Rana) एक विधान केलं. त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा झाली. त्यावर आता मुनगंटीवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राणा काय म्हणाले होते?
रामाला विरोध केल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं चिन्ह गेलं, असं विधान रवी राणा यांनी केलं होतं.
रवी राणा आणि नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले होते. मातोश्रीवर जात हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्याचं म्हणणं होतं. मात्र त्या आधीच त्यांना अटक झाली होती.
मुनगंटीवारांची प्रतिक्रिया
रवी राणा यांच्या या विधानावर सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर असे मेसेज येत असतात. त्याला गंमतीने घ्या, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र अंध:कारत गेला. 3 वर्षे अंधारात गेली. आता काळरात्र होता होता उष:काल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलंय. राज्याच्या हितासाठी आम्ही चांगले निर्णय घेऊ असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. ते गोंदियात बोलत होते.