Breaking : पडळकरांचा डिजीटल गनिमी कावा! अहिल्यादेवी होळकर स्मारकावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी, लोकार्पण केल्याचा दावा
पडळकर यांनी पुन्हा एकदा आपला गनिमीकावा दाखवला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय.
सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा पार पडल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलाय. एकीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास पडळकर आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी विरोध केला होता. तसंच मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर पडळकर ठाम होते. मात्र, कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणं शक्य नसल्याचं पाहायला मिळत होतं. अशावेळी पडळकर यांनी पुन्हा एकदा आपला गनिमी कावा दाखवला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय.
पडळकरांनी गनिमी कावा कसा साधला?
लोकांनी एखादी गोष्ट मनावर घेतली, लोकांनी कुठलं काम हाती घेतलं की कितीही पोलीस बंदोबस्त लावला तरी ते काम अडत नाही. 21 व्या शतकात टेन्कोलॉजीचा वापर करुन आम्ही ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली आहे. आमच्या दृष्टीने लोकार्पण सोहळा पार पडलाय. आम्ही ठरवलं होतं की पोलिसांसोबत कुठलाही वाद न करता हा सोहळा पार पाडायचा आणि आम्ही ते करुन दाखवलं आहे. आता पोलिसांनी आमच्या चार पोरांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना सोडायला जातोय. त्यांना सोडल्याशिवाय आमचं काम पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी दिलीय.
‘पापी लोकांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट उधळून लावला’
पुष्पवृष्टी करुन अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. पापी लोकांच्या हस्ते लोकार्पण होण्यापूर्वी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण पार पडलं याचं आम्हाला समाधान आहे. बहुजन, धनगर समाज हा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांनी पुढे जाणारा समाज आहे. तो पुण्यवान समाज आहे. या समाजाला बाजूला करत या ठिकाणी काही मंडळींनी उद्घाटनाचा घाट घातला होता तो आम्ही उधळून लावला आहे.
गोपीचंद पडळकर बहुजन समाजाचा वाघ – खोत
त्यांना माहिती नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, इथं आम्हाला गनिमी कावा कळतो. मी पोलिसांना सांगितलं होतं की आमचे पाच माणसं जातील आणि लोकार्पण करतील. पण ते नाही म्हणाले. मग 2 तारखेला परवानगी कशी? आम्ही त्यांना सांगितलं की आमचा वाद तुमच्याशी नाही. कुत्र्याला दगड मारला की कुत्रं दगडाला चावतं. पण वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला मारत नाही. वाघ ज्या दिशेनं दगड येतो, त्याच्या नरडीचा घोट घेतो. आणि आमदार गोपीचंद पडळकर बहुजन समाजाचा वाघ आहे वाघ… असं सदाभाऊ खोत म्हणाले.
इतर बातम्या :