‘सत्ताधाऱ्यांनी आपल्या बापांची स्मारके घोषित करून थडगी बांधली, माणदेशी साहित्यिकांची स्मारके का नाही?’ पडळकरांचा संतप्त सवाल
'सत्ताधाऱ्यांना प्रतिभावान व्यक्तिमत्वे दिसली नाहीत. त्या सर्वांनी आपल्या बापांची स्मारके घोषित करून त्यांची थडगी बांधली. मग माणदेशी साहित्यिकांची स्मारके का बांधली नाहीत? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय.
सांगली : ‘सत्ताधाऱ्यांना प्रतिभावान व्यक्तिमत्वे दिसली नाहीत. त्या सर्वांनी आपल्या बापांची स्मारके (Monument) घोषित करून त्यांची थडगी बांधली. मग माणदेशी साहित्यिकांची स्मारके का बांधली नाहीत? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलाय. सांगलीतील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी निमित्त आयोजित साहित्य संमेलनात गोपीचंद पडळकर बोलत होते. शंकरराव खरात (Shankarrao Kharat) यांच्या स्मारकासाठी आपण आमदार फंडातून 25 लाख देण्याची घोषणा पडळकरांनी केलीय. तसंच राजेंद्रआण्णा यांच्या बरोबरीने स्मारकाला सहाय्य करण्याची ग्वाही त्यांनी दिलीय.
पडळकर म्हणाले की, गावगाड्याचे खरे चित्र मांडताना ज्या विषयांचा तत्कालीन साहित्यामध्ये उल्लेखही नसायचा म्हणून यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी आमचे, जनतेचे पैसे वापरून आपल्या बापाची थडगी बांधली. पण त्यांना डॉ. शंकरराव खरात यांच्यासारख्या माणसाचे स्मारक बांधावे असे वाटले नाही. त्यांची थडगी बघायला 10, 20 लोकही जात नाहीत. पण हे स्मारक पूर्ण करण्यासाठी मी आज 25 लाख रुपयांचा निधी जाहीर करत आहे, अशी घोषणा पडळकर यांनी केलीय.
ज्येष्ठ साहित्यिक मा.शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होत असलेल्या साहित्य संमेलनाला उपस्थित होतो.पुढाऱ्यांनी आपल्याच लोकांची थडगी बांधली पण प्रतिभावान व्यक्तींची स्मारकं त्यांना बांधता आली नाहीत.मी आमदार फंडातून शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी २५ लाखांचा निधी जाहिर केला. pic.twitter.com/NFcRNB23ue
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 11, 2022
गोपीचंद पडळकरांचं विठुरायाला साकडं
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी दाखल झाले होते. सर्वसामान्य वारकऱ्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विठुरायाकडे काहीना काही मागणं मागितलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विठुरायाकडे शेतकऱ्यांसाठी साकडं घातलं आहे. ‘कष्टकरी शेतकरी बहुजनांचं दैवत श्री विठ्ठलाचा जयघोष सुरु आहे. आषाढी एकादशीनिमित्त सान-थोर मंडळी उत्साहात विठूरायाच्या भक्तीत लीन आहेत. श्री विठूरायाकडे एकच मागणं, या महाराष्ट्रात शेतीला सन्मान, कष्टाला मान, प्राणी-पक्षांचं गान राहू दे. जय हरी विठ्ठल. विठ्ठल बिरुदेवाच्या नावानं चांगभलं’, असं ट्वीट करत पडळकर यांनी विठ्ठला चरणी साकडं घातलं आहे.
कष्टकरी शेतकरी बहुजनांचं दैवत श्री विठ्ठलाचा जयघोष सुरू आहे.आषाढी एकादशी निमित्त सान-थोर मंडळी उत्साहात विठूरायाच्या भक्तीत लीन आहेत.श्री विठूरायाकडे एकच मागणं.या महाराष्ट्रात शेतीला सन्मान,कष्टाला मान,प्राणी-पक्ष्यांचं गान राहू दे.जय हरी विठ्ठल.विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं pic.twitter.com/7R9zYhSQW5
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 10, 2022