सांगलीत गोपीचंद पडळकरांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी

सांगली: वंचित बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभेसाठी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीकडून जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगेंचे चुलत बंधू जयसिंग शेंडगे […]

सांगलीत गोपीचंद पडळकरांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

सांगली: वंचित बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभेसाठी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली.

वंचित बहुजन आघाडीकडून जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगेंचे चुलत बंधू जयसिंग शेंडगे यांना आधीच उमेदवारी जाहीर  केली होती. मात्र सांगलीतील विरोधी पक्षांचे उमेदवार पाहता, वंचित बहुजन आघाडीने उमेदवार बदलण्याची तयारी केली होती.

वाचा- धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हिरोच्या भूमिकेत, ‘धुमस’चा ट्रेलर रिलीज 

गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीमुळे सांगलीत भाजपा, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षवेधी लढत होणार आहे. सांगलीत भाजपकडून संजयकाका पाटील, स्वाभिमानीकडून विशाल पाटील रिंगणात आहेत.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी कालच वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची नागपुरात भेट घेतली. गोपीचंद पडळकर हे सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र वंचित बहुजन आघाडीने आधीच आपला उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर केली. त्याआधी शेवटचा पर्याय म्हणून पडळकरांनी आंबेडकर ओवेसींची भेट घेतली. या भेटीमुळे वंचित आघाडी सांगलीतील उमेदवार बदलून गोपीचंद पडळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचं जवळपास निश्चित झालं होतं.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकर भाजपमधील धनगर समाजाचे नेते म्हणून महत्त्वाच्या पदावर होते. मात्र काही गोष्टींवरुन बिनसल्याने पडळकरांनी पक्षाला राम राम करत राजीनामा दिला आहे.

सांगलीत लोकसभेची सद्यस्थिती काय?

सांगली लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले संजयकाका पाटील हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनाच भाजपने पुन्हा एकदा सांगलीतून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यात आघाडीकडून स्वाभिमानीसाठी सोडलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवरुन स्वाभिमानीने दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना रणांगणात उतरवले आहे. तर सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीकडून जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगेंचे चुलत बंधू जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती.  आता त्यांच्याऐवजी वंबआने गोपीचंद पडळकर सांगलीतून उतरवले आहे.

संबंधित बातम्या 

सांगली : वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात? 

आंबेडकर आणि ओवेसींच्या भेटीसाठी गोपीचंद पडळकर नागपुरात!  

सांगलीची चुरस वाढली, पडळकरांच्या एन्ट्रीने तिरंगी लढत निश्चित  

माझी लायकी काय ते निवडणुकीत दाखवतो, गोपीचंद पडळकरांचं संजय पाटलांना आव्हान  

जानकर ते पडळकर… लोकसभेसाठी सर्व धनगर नेते एकवटले!  

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हिरोच्या भूमिकेत, ‘धुमस’चा ट्रेलर रिलीज 

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.