EVM हॅकिंगच्या माहितीमुळेच गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन एक्स्पर्टचा दावा

नवी दिल्ली: इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही, याबाबत अमेरिकन सायबर एक्स्पर्टने मोठा दावा केला आहे. अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे, त्याने लंडनमध्ये दावा केला आहे की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक […]

EVM हॅकिंगच्या माहितीमुळेच गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन एक्स्पर्टचा दावा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

नवी दिल्ली: इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही, याबाबत अमेरिकन सायबर एक्स्पर्टने मोठा दावा केला आहे. अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे, त्याने लंडनमध्ये दावा केला आहे की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलं होतं. 14 लोकांच्या टीमने हे काम केलं होतं. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा अमेरिकेच्या एक्स्पर्टने लंडनमध्ये केला आहे. तर दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सांगण्यावरुन हॅक केलं असल्याचाही दावा करण्यात आला.

युरोपमध्ये इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन (IJA) कडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने अमेरिकन सायबर एक्स्पर्टला बोलवण्यात आलं आहे.

भारतात वापरण्यात येणारे ईव्हीएम ज्या अमेरिकन सायबर एक्स्पर्टने केले आहेत, त्याच्या दाव्यानुसार भारतातील ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतात.  या एक्स्पर्टने आज लंडनमध्ये एक प्रेझेंटेशन देऊन ईव्हीएम कसे हॅक केले जाऊ शकतात, याची माहिती लाईव्ह दिली.  2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली होती, असा दावा या एक्स्पर्टने केला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचीही हजेरी होती.

सईद शूजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे. त्याच्या मते, आम्हाला ईसीआयएलकडून निर्देश दिले होते की, ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही? आणि ते कसं होऊ शकतं याची माहिती द्या, असं म्हटलं होतं. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना याबाबत माहिती होती, त्यामुळेच त्यांची हत्या झाली.

भाजपकडून ईव्हीएम हॅकचा प्रयत्न

ईव्हीएम एक्स्पर्टच्या दाव्यानुसार, भाजपवर लोकांनी लक्ष ठेवलं नसतं, तर भाजप राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ईव्हीएम हॅक करण्याच्या प्रयत्नात होतं.

काय आहेत हॅकरचे दावे?

-रिलायन्स जिओने लो फ्रिक्वेन्सी सिग्नल देऊन ईव्हीएम टॅम्पर करण्यात मदत केली. जिओच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत माहित नाही. भारतात नऊ ठिकाणी हे काम केलं जातं.

-आमच्या टीमने हस्तक्षेप केला नसता तर भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही विजय मिळवला असता.

-भारतातील एका मोठ्या पत्रकाराला ईव्हीएमची स्टोरी सांगितलेली आहे. हा पत्रकार दररोज रात्रीच्या शोमध्ये ओरडत असतो.

-दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही हॅकिंग होऊ दिली नाही. अन्यथा हे राज्यही भाजपने जिंकलं असतं.

-भाजपशिवाय सपा, बसपा आणि आपनेही ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं का याबाबत विचारणा केली.

-2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलंय हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंना माहित होतं. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी तंझिल अहमद हे गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी करत होते आणि हत्येचा गुन्हा दाखल करणार होते. पण या अधिकाऱ्याचीही हत्या करण्यात आली.

प्रसिद्ध भारतीय पत्रकाराची भेट

एक्स्पर्टच्या दाव्यानुसार , तो भारतातील एका प्रसिद्ध भारतीय पत्रकाराला भेटला होता. त्याला संपूर्ण कहाणी सांगितली होती. भारतातील 12 राजकीय पक्षांनी ईव्हीएम हॅकसाठी आपल्याशी संपर्क साधला होता, असा दावा अमेरिकन एक्स्पर्टने केला आहे.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत EVM शी छेडछाड

शूजाच्या दाव्यानुसार लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत छेडछाड झाली होती. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये छेडछाड झाली होती. ईव्हीएमला लो फ्रिक्वेन्सी सिग्नलने बाधित केलं जाऊ शकतं.

गौरी लंकेशही बातमी करणार होत्या

ज्येष्ठ दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांनी ही बातमी चालवण्याची तयारी केली होती, मात्र त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा या एक्स्पर्टने केला.

राजू शेट्टींकडून काही दिवसांपूर्वीच शंका उपस्थित

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वीच गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला की घातपात अशी शंका उपस्थित केली होती. जेजुरी इथं 20 ऑक्टोबर 2018 रोजी आरक्षण एल्गार दसरा महामेळावा झाला होता, त्यावेळी राजू शेट्टी यांनी ही शंका उपस्थित केली होती.

निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

“भारतात ईव्हीएमशी छेडछाड केली जाते, असा दावा लंडनमधील एका कार्यक्रमात करण्यात आलाय याची भारतीय निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. पक्षीय भावनेने प्रेरित अशा दाव्यांबाबत आयोग सावधान आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएमची विश्वसनियता दृढ करण्यासाठी आयोग सक्षम आहे. भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने विविध पातळीवर पडताळणी करुन ईव्हीएमची निर्मिती केली जाते. 2010 पासूनच प्रसिद्ध तज्ञांच्या देखरेखीखाली ही पडताळणी होते. याबाबतीत काय कारवाई केली जाऊ शकते याची माहिती घेतली जात आहे,” असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलंय.

'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.