24 तारखेपासून आम्ही सांगतोय, पण तुम्ही लोकं समजूनच घेत नाही : अजित पवार
आमच्या आघाडीचा आकडा 145 आहे. आम्ही सगळे मिळून एकत्र आलो तरीही आम्ही 115 पर्यंत जातो. त्यापुढे काही जात नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी (Ajit pawar on government formation) दिली
मुंबई : “महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला (Ajit pawar on government formation) आहे. हे मी निकाल लागल्यापासून सांगत आहेत. तरीही तुम्ही लोकं समजून घेत नाही. आमच्या आघाडीचा आकडा 145 आहे. आम्ही सगळे मिळून एकत्र आलो तरीही आम्ही 115 पर्यंत जातो. त्यापुढे काही जात नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी (Ajit pawar on government formation) दिली.” राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
याबाबत अजित पवारांशी बातचीत करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. “मी तुम्हा सर्वांना निकाल लागल्यापासून सांगतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. हे मी तुम्हाला 24 तारखेपासून वारंवार सांगत आहेत. मात्र तरीही तुम्ही लोकं हे समजून घेत नाही.”
“आम्ही काल (5 नोव्हेंबर) राज्यपालांना भेटलो. त्यावेळी त्यांनाही हेच सांगितलं. आता काळजीवाहू सरकार आहे. त्यामुळे तुम्ही याबद्दलचा निर्णय घ्या आणि काहीतरी तोडगा काढा. आमच्या आघाडीचा आकडा 145 आहे. आम्ही सर्व मिळून एकत्र आलो तरी आमचा आकडा 115 पर्यंत जातो. त्यापुढे काही आम्ही जात नाही. पण काही जण हा आकडा 170 पर्यंत जातो असे म्हणतात. पण ते कुठल्या गणिताने सांगतात ते मला काहीही समजत नाही, असेही ते म्हणाले. “
यावेळी त्यांना शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला का याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली. पण त्या भेटीत त्यांचे नेमकं काय बोलणं झालं याबाबत मला माहीत नाही.”
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आम्ही अवकाळी पावसाच्या संदर्भात काय केलं पाहिजे याबाबत चर्चा केली. यावेळी काल राज्यपालांसोबतच्या चर्चेचे निवदेन दिले. राज्यपाल आमच्याशी काय बोलले याबाबतची सविस्तर माहिती आम्ही शरद पवारांना दिली,” असेही ते (Ajit pawar on government formation) म्हणाले.
सत्ता स्थापना लवकरात लवकर व्हावी यासाठी भाजपकडून शिवसेनेला विविध प्रस्ताव पाठवण्यात येत आहे. शिवसेनेने मात्र या सर्व प्रस्तावाला कोणतेही उत्तर द्यायला तयार नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील 50-50 च्या वाट्यावर अडून बसली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 14 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.
शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचलं आहे, मात्र भाजपसोबत शिवसेनेचा अजूनही 36 चाच आकडा दिसत आहे.
भाजपला 12 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 117 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
संबंधित बातम्या :
भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटणार, मुनगंटीवार ते केसरकर महायुतीचं सरकार : सुधीर मुनगंटीवार