नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Tweeted About NEET And JEE Exams) यांनी NEET आणि JEE परीक्षेवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकायला हवं आणि त्यांच्या समस्या सोडवायला हव्यात, असं राहुल गांधी म्हणाले (Rahul Gandhi Tweeted About NEET And JEE Exams).
NEET आणि JEE परीक्षेबाबत सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा
याप्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट केलं. “आज आमचे लाखो विद्यार्थी सरकारला काही सांगू इच्छितात. सरकारने NEET, JEE परीक्षेबाबत त्यांचं म्हणणं ऐकायला हवं आणि सरकारने यावर काही अर्थपूर्ण तोडगा काढणे आवश्यक आहे”, असं ट्विट राहुल गांधींनी केलं.
आज हमारे लाखों छात्र सरकार से कुछ कह रहे हैं। NEET, JEE परीक्षा के बारे में उनकी बात सुनी जानी चाहिए और सरकार को एक सार्थक हल निकालना चाहिए।
GOI must listen to the #StudentsKeMannKiBaat about NEET, JEE exams and arrive at an acceptable solution.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 23, 2020
राहुल गांधींपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते आणि शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला विनंती केली होती की, NEET आणि JEE परीक्षेला आता रद्द करण्यात यावं.
“केंद्र सरकार NEET आणि JEE च्या नावावर लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळ करत आहेत. केंद्राला माझी विनंती आहे की त्यांनी या दोन्ही परीक्षा तात्काळ रद्द कराव्या. यंदाच्या वर्षाच्या अॅडमिशनसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. या अभूतपूर्व संकटाच्या वेळी, एका अभूतपूर्व निर्णयानेच तोडगा निघेल”, असं ट्विट मनिष सिसोदिया यांनी केलं (Rahul Gandhi Tweeted About NEET And JEE Exams).
JEE-NEET की परीक्षा के नाम पर लाखों छात्रों की ज़िंदगी से खेल रही है केंद्र सरकार. मेरी केंद्र से विनती है कि पूरे देश में ये दोनो परीक्षाएँ तुरंत रद्द करें और इस साल एडमिशन की वैकल्पिक व्यवस्था करे.
अभूतपूर्व संकट के इस समय में अभूतपूर्व कदम से ही समाधान निकलेगा. @DrRPNishank— Manish Sisodia (@msisodia) August 22, 2020
JEE-Main ची परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरपर्यंत आणि NEET ची परीक्षा 13 सप्टेंबरपर्यंत असेल, अशी घोषणा नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने केली होती.
राजकीय पक्षच नाही तर विद्यार्थीही या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. 3 मे रोजी होणाऱ्या या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या (Rahul Gandhi Tweeted About NEET And JEE Exams).
संबंधित बातम्या :
NEET JEE-Mains Exam Dates | ‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर