What India Thinks Today: वंदे मातरम आणि मुस्लिम समाज; राज्यापाल आरिफ मोहम्मद खान यांनी जाहिर कार्यक्रमात म्हटले वंदे मातरम, एकदा पहाच

त्यांनी समिटमध्ये सांगितले की ग्रीक पुस्तकांचे भाषांतरही नंतर केले गेले आणि त्याआधी संस्कृत पुस्तकांचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचे सर्य सिद्धांत हिंद सिंध या नावाने प्रकाशित झाले आहे.

What India Thinks Today: वंदे मातरम आणि मुस्लिम समाज; राज्यापाल आरिफ मोहम्मद खान यांनी जाहिर कार्यक्रमात म्हटले वंदे मातरम, एकदा पहाच
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खानImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 7:11 PM

नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील लोक वंदे मातरम गाण्यास नकार देतात. ते म्हणतात, की ते त्यांच्या श्रद्धेच्या विरुद्ध आहे. ते वंदे मातरम (Vande Mataram) म्हणणार नाहीत. परंतु त्याच वंदे मातरमचे उर्दूमध्ये भाषांतर आघाडीचे मुस्लिम नेते आणि समाजसुधारक राज्यापाल आरिफ मोहम्मद खान (Governor of Kerala Arif Mohammad Khan) यांनी केले होते. तर आरिफ मोहम्मद खान यांनीही मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या तिहेरी तलाकच्या प्रथेला विरोध केला होता. त्यानंतर त्यांना केरळचे राज्यपाल बनविण्यात आले होते. आज पुन्हा राज्यापाल आरिफ मोहम्मद खान यांचे पुरोगामित्व सिद्ध झाले आहे. तर त्यांची देशभक्तीही दिसून आली आहे. राज्यपाल खान यांचा TV9ने आयोजित केलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट (What India Thinks Today Global Summit)मध्ये वंदे मातरम म्हणणारा व्हिडीओ समोर आला असून तो पसंत केला जात आहे.

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. TV9 ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ मध्ये ते प्रांजळपणे बोलले. यावेळी त्यांनी उर्दूमध्ये वंदे मातरमचे उच्चार करून सर्वांना चकित केले. वास्तविक, शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आवाहन केल्यानंतर आरिफ खान यांनी वंदे मातरमचे उर्दूमध्ये उच्चार केले. दरम्यान, अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत ते म्हणाले की, “त्यामुळे दगडफेक होत आहे. कारण आपण शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे.”

आपण शिक्षणाकडे पाठ फिरवली

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. TV9 ग्लोबल समिट व्हाट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटमध्ये ते प्रांजळपणे बोलले. यावेळी त्यांनी उर्दूमध्ये वंदे मातरमचे उच्चार करून सर्वांना चकित केले. वास्तविक, शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आवाहन केल्यानंतर आरिफ खान यांनी वंदे मातरमचे उर्दूमध्ये उच्चारन केले. दरम्यान, अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबतही ते म्हणाले की, “हे फक्त त्यामुळे दगडफेक होत आहे. कारण आपण शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे.”

मुलांच्या शिक्षणाची खात्री

त्यांनी समिटमध्ये सांगितले की ग्रीक पुस्तकांचे भाषांतरही नंतर केले गेले आणि त्याआधी संस्कृत पुस्तकांचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचे सर्य सिद्धांत हिंद सिंध या नावाने प्रकाशित झाले आहे. याशिवाय ते म्हणाले की, त्या लोकांचाही प्रत्येकाच्या शिक्षणात वाटा असतो, जे स्वत: शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा वेळी आपल्या शिक्षणाबरोबरच त्या व्यक्तीच्या मुलांच्या शिक्षणाचीही काळजी घेतली पाहिजे, ज्याने तुमच्या शिक्षणात हातभार लावला आहे. यादरम्यान स्वामी विवेकानंदांचा उल्लेख करून ते म्हणाले की, जोपर्यंत लाखो लोक निरक्षरता आणि उपासमारीचे बळी आहेत, तोपर्यंत मी प्रत्येक भारतीयाला देशद्रोही मानेन जो आपल्या मुलांच्या शिक्षणाची खात्री करत नाही.

वंदे मातरम् का उर्दू अनुवाद

तस्लीमात, मां तस्लीमात

तू भरी है मीठे पानी से,

फल-फूलों की शादाबी से,

दक्खिन की ठंडी हवाओं से,

फसलों की सुहानी फिजाओं से

तस्लीमात, मां तस्लीमात्

तेरी रातें रोशन चांद से,

तेरी रौनक सब्जे-फाम से,

तेरी प्यार भरी मुस्कान है,

तेरी मीठी बहुत जुबान है,

तेरी बाहों में मेरी राहत है,

तेरे कदमों में मेरी जन्नत है

तस्लीमात, मां तस्लीमात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.