मंत्रिपदाची शपथ घेताना राज्यपाल भडकले, के. सी. पाडवींना पुन्हा शपथ घेण्यास दरडावलं

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमडळ विस्तार सोहळ्यात एक उपमुख्यमंत्री, 25 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रागावल्याचं पाहायला मिळालं (Governor Bhagat Singh Koshyari get angry).

मंत्रिपदाची शपथ घेताना राज्यपाल भडकले, के. सी. पाडवींना पुन्हा शपथ घेण्यास दरडावलं
Follow us
| Updated on: Dec 30, 2019 | 5:14 PM

मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमडळ विस्तार सोहळ्यात एक उपमुख्यमंत्री, 25 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रागावल्याचं पाहायला मिळालं (Governor Bhagat Singh Koshyari get angry). काँग्रेसचे आमदार अॅड. के. सी. पाडवी मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांनी लिखित शपथेच्या व्यतिरिक्त मतदारांचे आभार मानत राज्यघटनेविषयी वक्तव्य केलं. त्यानंतर संतापलेल्या कोश्यारी यांनी त्यांना पुन्हा शपथ घेण्यास दरडावल्याचं पाहायला मिळालं.

अॅड. के. सी. पाडवी यांनी आपली शपथ घेऊन झाल्यावर शेवटी आपली इतर मतेही व्यक्त केली. ते म्हणाले, “मी निसर्गाला आणि मानवतावादाला नतमस्तक होतो. 7 वेळा मला निवडून देणाऱ्या सर्व मतदारांना आणि महाराष्ट्रासह सर्व भारतीयांना वंदन करतो. भारतीय राज्यघटना माझ्या अंतरआत्म्याला अर्पण करतो.”

पाडवी यांनी लिखित शपथेशिवाय बोलल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगलेच भडकले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यात हस्तक्षेप करण्यास सांगितले. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उभे राहून पाडवी यांना खुणावत होते. कोश्यारी म्हणाले, “हे चालणार नाही. तुम्ही पुन्हा वाचा. तुमच्यासमोर शरद पवार, मल्लिकार्जून खर्गे आणि इतर वरिष्ठ नेते बसलेले आहेत त्यांना विचारा. ते जर मला नकार देत असतील तर मीही तुम्हाला मनाई करणार नाही. तुम्ही शपथेमध्ये जितकं दिलं आहे तितकंच वाचा. पुन्हा जाऊन जे लिहिलं आहे तितकंच वाचा.”

दरम्यान के. सी. पाडवी यांनी राज्यपाल कोश्यारी यांना स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, कोश्यारी यांनी त्यांच काहीही न ऐकता पुन्हा शपथ घेत त्यात जे लिहिलं आहे तितकंच वाचण्यास सांगितलं. यामुळे काही वेळ गोंधळलेल्या पाडवी यांनी देखील यावर जास्त अडून न राहता पुन्हा शपथ घेतली. हे सर्व सुरु असताना समोर बसलेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री जयंत पाटील आणि ग्रामीण विकास मंत्री छगन भूजबळ इत्यादी नेत्यांनाही हसू आवरले नाही. राज्यपालांच्या शेजारी बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही आवाक होऊन हे सर्व पाहात होते.

काँग्रेसने पहिल्यांदा के. सी. पाडवी यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. याआधी आदिवासी खात्यासाठी काँग्रेसकडून नंदूरबारच्या सुरुपसिंग नाईक यांना मंत्रिपदासाठी संधी मिळाली होती. मात्र, यावेळी ते पराभूत झाल्याने त्याच्याजागेवर आता पाडवी यांना पसंती देण्यात आली आहे. के. सी. पाडवी यांनी लोकसभा निवडणुकही लढली मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.