भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या, महाराष्ट्रात असं कधी घडलंच नव्हतं…
भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संपूर्ण राज्यात राज्यपाल हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती.
प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsing koshyari ) यांचा राजीनामा ( Resign ) राष्ट्रपती यांनी मंजूर केला आहे. रमेश बैस ( Ramesh Bais ) आता राज्याचे नवे राज्यपाल असणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( supriya sule ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उशिरा का होईना राज्यपाल यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. नवे येणारे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत दहा वर्षे काम केलं आहे. त्यामुळे त्यांनाही जाऊन भेटणार आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा पण महापुरुषांच्या बद्दल केलेले भाष्य अतिशय दुर्दवी आहे. महाराष्ट्राच्या इतिहास नाही देशातच सुद्धा असे काही झाले नाही असेही सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.
भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर संपूर्ण राज्यात त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात आनंद व्यक्त केला जात आहे. महापुरुषांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या विधानावर त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संपूर्ण राज्यात राज्यपाल हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावरून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली होती.
त्यानंतर काही महिन्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून कार्यमुक्त होण्याची विनंती केली होती. त्यावरून भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन तात्काळ हटवा अशी मागणीही होऊ लागली होती.
त्यानंतर आज सकाळी राष्ट्रपती भवन येथून देशातील काही राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहे.
रमेश बैस यांच्या सोबत दहा वर्षे काम केले असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हंटले असून राज्यपाल पदी रुजू झाल्यास त्यांची भेट घेणार असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या विषयी पडदा टाकूयात असेही सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.
उशिरा का होईना त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे ही बाब अतिशय महत्वाची असून आपण इतर बाबी सोडून देऊ. राजकीय विषय सोडून महापुरुषांच्या बाबतीत केलेले भाष्य दुर्दवी असून असं कधीच महाराष्ट्राच्या इतिहास घडली नाही म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.