Devendra Fadanvis | राज्यपालांचं वक्तव्य अतिशयोक्ती, भाजप सहमत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण
राज्यपालांच्या वक्तव्याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' राज्यपालांच्या विधानाशी मी सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं कार्य सर्वाधिक आहे.
मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं योगदान खूप मोठं आहे. राज्यपालांनाही (Maharashtra Governor) याची जाणीव असावी. मात्र एखाद्या विशेष कार्यक्रमात आपण अतिशयोक्ती अलंकार वापरतो, त्या स्थितीतून राज्यपालांचं वक्तव्य आलं असावं. याबद्दल ते स्वतः स्पष्टीकरण देतील, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं आहे. मुंबईत त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. काल एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी माणसांचं योगदान काढून घेतलं तर काहीच उरणार नाही. मुंबईत तेवढा पैसा उरणार नाही, असं वक्तव्य केलं. याविरोधात सर्वच राजकीय पक्षांकडून तसेच सामान्य मराठी माणसांकडून तीव्र टीका केली जातेय.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्यपालांच्या वक्तव्याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ राज्यपालांच्या विधानाशी मी सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं कार्य सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रातही मराठी माणसाने प्रगती केलीय ती जगात मराठी माणसाचं नाव आहे. विविध समाजांचं योगदान नाकारता येणार नाही. यात गुजराती, मारवाडी समाजही असेल. पण महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, उद्योजक, साहित्यिक आदींचा सहभाग जास्त आहे. एकूणच या बाबीला बघितलं तर एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो. तशाचप्रकारे मा. राज्यपाल बोलले आहेत. विश्वास आहे की, त्यांच्याही मनात मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग मोठा आहे…
राज्यपालांचं वक्तव्य काय?
राज्यपाल यांनी काल एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करताना मुंबई आणि मराठी माणसांना दुखावणारं वक्तव्य केलं. ते म्हणाले, ‘ कधी कधी मला वाटतं. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानींना काढून टाकलं तर तुमच्याकडे काहीच पैसा उरणार नाही. त्या वेळेला मुंबईला आर्थिक राजधानीदेखील म्हणता येणार नाही… राज्यपालांनी केलेल्या याच वक्तव्यावरून सगळीकडून टीकेची झोड उठली आहे. भाजपने तर या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे म्हटले आहे. मात्र शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही राज्यपालांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली.
अजित पवारांच्या विदर्भ दौऱ्यावर फडणवीस काय म्हणाले?
विरोधी पक्ष नेते अजित पवार सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाे, ‘ मला आनंद आहे किमान विरोधी पक्षात गेल्यावर अजितदादा विदर्भात गेले. सत्तेत असते तर विरोधी पक्षात गेले असते. काही निर्णय घेतले असते. हिताचे निर्णय घेतले असते. त्यांचं काम आहे विरोधात बोलणं. त्यांच्या सरकारने जेवढ्या वेळात मदत केली त्याच्या. एक दशांश मदत करू…