पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक, मतदार होण्यासाठी एवढंच करा

नाशिक आणि अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुक होणार आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभाग शिक्षक विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक, मतदार होण्यासाठी एवढंच करा
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 9:59 PM

मुंबई : राज्यात विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नाशिक आणि अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा(Graduate and Teacher Constituency Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. 1 नोव्हेंबरपासून या निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणी सुरू होणार आहे. नाशिक आणि अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुक होणार आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभाग शिक्षक विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षकांची नव्याने नोंदणी होणार आहे. 1 नोव्हेंबर 2022 पासून नवीन मतदार नोंदणी होणार आहे. तर 1 ऑक्टोबर से 7 नोव्हेंबर दरम्यान पदवीधर व शिक्षक मतदारांची नोंदणी होणार आहे.

23 नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. हरकतीची छाननी झाल्यानंतर 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

राज्याच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पुर्वी किमान 3 वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत.

पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. 18 भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-18.pdf यावर सुध्दा उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा मार्कशिटची छायांकित प्रत जोडावी लागणार आहे. 1 ऑक्टोबर पर्यंत पदवीधर मतदार संघाकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा असणार आहे.

शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी लगतच्या सहा वर्षातील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत.

शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्र. 19 भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-19.pdf यावर सुध्दा उपलब्ध आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.