Gram Panchayat Election : ना ठाकरे ना शिंदे, ग्रामपंचायत निकालांत भाजपानंतर या पक्षाचं पारडं जड दिसतंय?

सकाळी 10 वाजेच्या सुमारास जवळपास 667 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 167 ग्राम पंचायती मिळवत भाजपाने राज्यात आघाडी घेतल्याचं चित्र आहे.

Gram Panchayat Election : ना ठाकरे ना शिंदे, ग्रामपंचायत निकालांत भाजपानंतर या पक्षाचं पारडं जड दिसतंय?
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 11:59 AM

मुंबईः राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा निकाल (Gram Panchayat Election) हाती येण्यास आता काही तासच बाकी आहेत. 7,751 ग्रामपंचायतींमध्ये कोणत्या पक्षाचं पारडं जड होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही ग्रामपंचायतींची मतमोजणी (Vote Counting) सुरु झाली आहे तर काही ठिकाणी सकाळी दहा वाजेपासून मोजणी सुरु होतेय. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, स्थानिक पातळीवर भाजप हा आघाडीवरचा पक्ष दिसून येतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्या पाठोपाठ बाजी मारलेली आहे.

सकाळी 10 वाजेच्या सुमारास जवळपास 667 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 167 ग्राम पंचायती मिळवत भाजपाने राज्यात आघाडी घेतल्याचं चित्र आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात 122 ग्राम पंचायती आल्याचं दिसून येतंय.

तर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात कोण बाजी मारतंय याकडेही सर्वांचं लक्ष आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिंदे गटाच्या ताब्यात 108 ग्रामपंचायती आहेत.

ठाकरे गटाने 75 ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यात यश मिळवलंय.

काँग्रेस पाचव्या स्थानावर असल्याचे दिसून येतेय. 62 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे पॅनल विजयी झाल्याचे चित्र आहे.

आम आदमी पार्टीनेही खाते उघडले आहे. उस्मानाबादेत कावळेवाडी ग्रामपंचायतीत आपचे अजित खोत विजयी झाले आहेत.

कोल्हापूरच्या येरवाड ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्षाने खातं उघडलं आहे.

128 ग्रामपंचायतीत अपक्षांनीदेखील बाजी मारल्याचं चित्र आहे.

राज्यभरातील ग्रामपंचायत निकालांमध्ये शिंदे गटाचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस, बच्चू कडू, विश्वजित कदम, राणा जगजित सिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला.

7,751  ग्रामपंचयातींपैकी 590 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.  252 ग्राम पंचायतींवर शिंदे-भाजप गटाचा , 227 ग्रामपंचायतींत महाविकास आघाडीच्या पॅनलचा बिनविरोध विजय झाला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.