Grampanchayat Election Result 2022: राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतीचे आज निकाल, काय आहेत अपडेट्स?

ग्रामपंचायत भाजप निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केला आहे.

Grampanchayat Election Result 2022: राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतीचे आज निकाल, काय आहेत अपडेट्स?
ग्रामपंचायत निवडणूक Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 10:13 AM

मुंबई,  राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतीचे आज निकाल (Grampanchayat Election Result 2022) लागणार आहेत. मतमाेजणीला सकाळी 10 वाजता पासून सुरूवात हाेणार आहे. राज्यातील एकूण 590 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविराेध झाल्या आहेत, त्यामुळे 7,135 ग्रामपंचायतींसाठी आज मतमाेजणी हाेणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकींसाठी अनेक दिग्गजांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बच्चू कडू, बाळासाहेब थाेरात, विश्वजीत कदम, राणा जगजीतसिंह तसेच देवेंद्र भुयार यांसारख्या दिग्गजांची प्रतीष्ठा पणाला लागलेली आहे.

अशी आहे निवडणूकांची आकडेवारी

7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या हाेत्या त्यापैकी 7 हजार 681 ग्रामपंचायतींंमध्ये निवडणूका पार पडल्या.  राज्यातील एकूण 590 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविराेध झाल्या तर 72 ग्रामपंचायतींच्या निवडणूका वेगवेगळ्या कारणांमुळे रद्द करण्यात आल्या हाेत्या.

हे सुद्धा वाचा

बिनविराेध पार पडलेल्या एकूण 590 ग्रामपंचायती पैकी ठाकरे गटाचे 65, शिंदे गटाचे 103, भाजपचे 149, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 108, काँग्रेसच्या 54 आणि इतर 111 जागांवर  बिनविराेध पार पडल्या.

बिड जिल्हातील नाथरा या गावी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. आमदार विश्वजीत कदम यांचे गाव असलेल्या साेनसळमध्ये देखील आज मतमाेजणी हाेणार आहे.

अहमदनगर जिल्हातील जाेरवे या गावात देखील निवडणूक पार पडली. या निवडणूकीमध्ये बाळासाहेब थाेरात यांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. राणा जगजीतसिंह यांच्या उस्मानाबाद जिल्हातील तेर या गावीदेखील निवडणूक पार पडली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्दमध्येदेखील निडणूक पार पडली आहे.

भाजप  नंबर एकचा पक्ष असल्याचा उपमुख्यमंत्र्यांचा दावा

ग्रामपंचायत भाजप निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केला आहे. भाजप आणि शिंदे गटाने 300 पेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिंदे गटाने 40 पेक्षा जास्त सरपंचपदं मिळवल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत 125-130 जागा जिंकल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. मित्रपक्षांसह 150 जागा जिंकल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.