Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा! निवडणूक खर्चात कपात, निवडणूक निरीक्षकाच्या मनमानी वसुलीला बसणार आळा

भाजपा- शिवसेना युतीचे सरकार येताच गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा देण्यात आला असून, सोसायटीच्या निवडणूक खर्चात मोठी कपात करण्यात आली आहे.

गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा! निवडणूक खर्चात कपात, निवडणूक निरीक्षकाच्या मनमानी वसुलीला बसणार आळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 1:26 PM

मुंबई : सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था (Maharashtra Co-operative Society) उपविधी 1960 कलम 73 खंड B&C (11) मधील बदलांनुसार 250 पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणुका घेण्यासाठी 340 शासनमान्य व्यक्तींच्या पॅनेलमधून निवडणूक निरीक्षक नियुक्त करुन निवडणुका (Election) घेण्याचे निर्देश शासनाने दिले होते.गृहनिर्माण सोसायटीच्या विशेषत: लहान सोसायट्यांवर अशा निवडणुकांच्या खर्चाचा अतिरिक्त बोजा पडू नये, यासाठी ही बाब आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) गेले वर्षेभर सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास 50,000 सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणूक खर्चासाठी मोठा खर्च करावा लागत होता. आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील 40 सभासद संख्या असलेल्या वांद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुकीसाठी, शासनाने मंजूर केलेल्या निवडणूक निरीक्षकाने 10 मिनिटासाठी तब्बल 21,000 रू आकारल्याची माहिती ही आमदार  शेलार यांनी विधानसभेत दिली होती.

असे असणार नवे दर

आधीच कोरोना महामारीशी झगडत असलेल्या 50,000 सहकारी गृहनिर्माण संस्थांना अतिरिक्त खर्चाचा बोजा आणि या निवडणूक निरीक्षकांकडून निवडणूक खर्चाच्या नावाखाली वसूल केलेल्या अन्यायकारक अवाजवी शुल्काचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हा खर्च कमी करा यासाठी शेलारांकडून पाठपुरावा सुरू होता. अखेर नव्या सरकारने याबाबत शासन निर्णय काढला असून, सोसायट्यांचा भुर्दंड कमी केला आहे. आता 100 सदस्यांपर्यंत रु.7500, बिनविरोध निवडणुकीसाठी रु. 3500 खर्चाची मर्यादा शासनाने निश्चित केली आहे. त्यामुळे सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

टीप : हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.

रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा
रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा.
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा.
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका.
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले.
त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?
त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?.
तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला
तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला.
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण....
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण.....
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर.
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य.
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल.