Arvind Kejriwal : गुजरातमध्येही फ्री वीज देणार, मोदीचं गुजरात जिंकण्याचा केजरीवालांनी आखला प्लॅन, यश येणार?

भाजपने 15 लाख देणार असल्याचे सांगितले होते. मग ही निवडणूक नौटंकी असल्याचे सांगितले. ते फक्त म्हणतात पण आम्ही हमी देतो. आम्ही काम केले नाही तर पुढच्या वेळी मतदान करू नका, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.

Arvind Kejriwal : गुजरातमध्येही फ्री वीज देणार, मोदीचं गुजरात जिंकण्याचा केजरीवालांनी आखला प्लॅन, यश येणार?
गरिबांच्या जेवणावरही टॅक्स, श्रीमंतांचे 5 लाख कोटी माफ, वाह रे सरकार, अरविंद केजरीवाल भाजपवर बरसलेचImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 3:47 PM

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) गुरुवारी गुजरातमध्ये पोहोचले. येथे त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाची (Aam Admi Party) पहिली रणनिती जाहीर केली. केजरीवाल यांनी गुजरातमध्ये (Gujrat Election 2022) मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले सध्या महागाई खूप वाढली आहे. ही एक मोठी समस्या आहे. विजेच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. जसे आम्ही दिल्लीत मोफत वीज दिली. पंजाबमध्ये तीन महिन्यांत मोफत वीज देण्यात आली. तसेच गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर मोफत वीज देऊ. तसेच मी गुजरातमध्ये पहिली हमी म्हणून मोफत वीज देण्याचे वचन देतो, असे म्हणत त्यांनी भाजपला धडकी भरवायला सुरू केलं आहे. यावेळी केजरीवाल म्हणाले भाजपने 15 लाख देणार असल्याचे सांगितले होते. मग ही निवडणूक नौटंकी असल्याचे सांगितले. ते फक्त म्हणतात पण आम्ही हमी देतो. आम्ही काम केले नाही तर पुढच्या वेळी मतदान करू नका, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.

कोणत्या तीन गोष्टी देणार?

आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये विजेबाबत तीन कामे केली. गुजरातमध्येही तेच करणार, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिलं आहे. त्या तीन गोष्टी कोणत्या यावरही एक नजर टाकूया…

  1. सरकार स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यांनी प्रत्येक कुटुंबाला 300 युनिट मोफत वीज देणार.
  2. 24 तास वीज उपलब्ध होणार असून वीज मोफत मिळणार आहे. वीजपुरवठा खंडित होणार नाही.
  3. 31 डिसेंबर 2021 पर्यंतची जुनी घरगुती बिले माफ केली जातील.

दारू सहज मिळते

अरविंद केजरीवाल म्हणाले, गुजरातमध्ये दारू सहज मिळते. आम्हाला अवैध दारू विकून देणगी गोळा करण्याची गरज नाही. इतकंच नाही तर केजरीवाल यांनी पीएम मोदींच्या रेवाडी मुक्त असल्याच्या वक्तव्यालाही प्रत्युत्तर दिलं आहे. केजरीवाल म्हणाले मोफत वीज, मोफत शिक्षणाप्रमाणे आम्ही जी मोफत रेवाडी लोकांमध्ये वाटली आहे, तो देवाचा प्रसाद आहे. पण हे लोक फुकट रेवरी फक्त त्यांच्या मित्रांना देतात, त्यांची कर्ज माफ करतात, हे पाप आहे. तर जनतेला मोफत रेवाडी दिल्याने श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. आपल्या मित्रांना, मंत्र्यांना देऊन असे प्रसंग घडतात. श्रीलंकन ​​मित्रांना मोफत रेवडी द्यायचा. तो जनतेला दिला असता तर जनतेने त्याला घरात घुसून हाकलले नसते. मोफत रेवडी हा जनतेसाठी देवाचा प्रसाद आहे. मित्रांना मोफत रेवडी देणे हे पाप आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.