गांधीनगर : गुजरातमधील भाजपचे ज्येष्ठ नेते, कायदा आणि शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासामा यांना हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. ढोलका विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवैध असल्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिले आहेत. 2017 मध्ये भूपेंद्रसिंग चुडासमा विजयी झाले होते. (Gujarat BJP Law Minister Bhupendrasinh Chudasama election declared illegal)
भूपेंद्रसिंग चुडासामा 2017 च्या निवडणुकीत ढोलका मतदारसंघातून अवघ्या 327 मतांच्या फरकाने निवडून आले होते. या निकालाला कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार अश्विन राठोड यांनी आव्हान दिले होते. मतमोजणीत फेरफार केल्याचा आरोप राठोड यांनी केला होता.
429 बॅलेट मतांकडे दुर्लक्ष करुन फेरफार केल्याचा दावा कॉंग्रेस उमेदवार अश्विन राठोड यांनी केला होता. या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ढोलकाचे अधिकारी धवल जानी यांची कोर्टाच्या आदेशाने बदली झाली होती.
भूपेंद्रसिंग चुडासामा यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय सत्ताधारी भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेस नेते भरत सोलंकी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Gujarat BJP Law Minister Bhupendrasinh Chudasama election declared illegal)
Welcome the decision of Gujarat High court on Dholka assembly election 2017. Satyamev Jayte. @INCIndia @SATAVRAJEEV
— Bharat Solanki (@BharatSolankee) May 12, 2020
#Gujarat’s Law Minister declared to be elected unlawfully. Bhupendrasinh Chudasama’s election declared illegal, null and void by Gujarat Highcourt. He had illegally crafted his win. In 2017#GujaratModelExposed
— Shaktisinh Gohil (@shaktisinhgohil) May 12, 2020