Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातची हॉटसीट, 141 जणांचे बळी, पूल दुर्घटनेचं मोरबी भाजपच्या हातून निसटतंय?

कांतिलाल हे आरएसएसचे स्वयंसेवक आहेत. 1995मध्ये त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. त्याच वर्षी ते मोरबी येथून निवडणूक लढले आणि विजयीदेखील झाले होते.

गुजरातची हॉटसीट, 141 जणांचे बळी, पूल दुर्घटनेचं मोरबी भाजपच्या हातून निसटतंय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 10:33 AM

अहमदाबादः  141 जणांचे प्राण घेणाऱ्या पूल दुर्घटनेमुळे मोरबी (Morbi Constituency) सध्या गुजरातमधील (Gujrat) हॉट सीट बनलंय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनता कुणाला मत देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भारतीय जनता पार्टीने (BJP) या मतदार संघातून कांतिलाल अमृतिया यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

तर काँग्रेसचे उमेदवार जयंतीलाल जेराजभाई पटेल हे अमृतिया यांच्यासमोर उभे आहेत. आम आदमी पार्टीच्या तिकिटावर पंकज कांतीलाल हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.

प्राथमिक फेरीत हाती आलेल्या निकालांनुसार, भाजपच्या हातून ही जागा जातेय की काय असे दिसून येत आहे. कांग्रेसचे जयंतीलाल जेराजभाई हे 600 मतांनी आघाडीवर आहेत.

29 ऑक्टोबर रोजी मोरबी येथील झुलता पूल कोसळला होता. या दुर्घटनेत १४१ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता.

ही दुर्घटना घडल्यानंतर भाजपचे कांतिलाल अमृतिया यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं होतं. याचंच बक्षीस म्हणून त्यांना येथून तिकिट देण्यात आलं.

पक्षातील सूत्रांच्या मते, उमेदवारांच्या यादीत आधी कांतिलाल अमृतिया यांचं नाव नव्हतं. मात्र दुर्घटनेवेळी कांतिलाल यांनी मच्छु नदीत बुडणाऱ्या लोकांचे प्राण वाचवले.

त्यामुळे भाजपाकडून त्यांना हे फळ मिळालं. त्यांना आमदारकीचं तिकिट मिळालं. यापूर्वी या जागेवर ब्रजेश मेरजा विजयी झाले होते.

कांतिलाल हे आरएसएसचे स्वयंसेवक आहेत. 1995मध्ये त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. त्याच वर्षी ते मोरबी येथून निवडणूक लढले आणि विजयीदेखील झाले होते.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.