गुजरात काँग्रेसला मोठा झटका, अल्पेश ठाकोर यांचा राजीनामा
अहमदाबाद : लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचा युवा चेहरा असलेले आमदार अल्पेश ठाकोर यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचं त्यांचे निकटवर्तीय असलेले आमदार धवल सिंग झाला यांनी सांगितलं. काँग्रेसचा हात सोडून अल्पेश ठाकोर आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही दिवसांपूर्वी […]
अहमदाबाद : लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचा युवा चेहरा असलेले आमदार अल्पेश ठाकोर यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचं त्यांचे निकटवर्तीय असलेले आमदार धवल सिंग झाला यांनी सांगितलं. काँग्रेसचा हात सोडून अल्पेश ठाकोर आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही दिवसांपूर्वी अल्पेश ठाकोर हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, अल्पेश ठाकोर यांनीच या चर्चेच खंडण केलं होतं. आता अप्लेश ठाकोर यांनी काँग्रेस सोडल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाला 11 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर गुजरातमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी काँग्रेसला अल्पेश ठाकोर यांचा खूप फायदा झाला.
लोकसभा निवडणुकांमधील जागावाटपावरुन अल्पेश ठाकोर हे काँग्रेसवर नाराज होते. कारण गुजरातमधील चार लोकसभा जागांवर आपल्या जवळच्या उमेदवारांना उमेदवारी देण्याची मागणी ठाकोर यांनी काँग्रेसकडे केली होती. गुजरातमधील पाठण, मेहसाणा, बनासकांठा आणि साबरकांठा या चार जागांवर आपल्या उमेदवारांना तिकीट द्याव, अशी मागणी अल्पेश ठाकोर यांची होती. मात्र, त्यांच्या या मागणीकडे काँग्रेसने दुर्लक्ष केलं. त्यामुळे अल्पेश ठाकोर आणि त्यांची ठाकोर सेना काँग्रेसवर नाराज होती.
आता अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने त्यांची भाजप प्रवेशाची शक्यता वाढली आहे. अल्पेश ठाकोर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसेल, हे निश्चित.