Gulabrao Patil : संस्था हडप केल्याच्या आरोपातून गुलाबराव पाटील निर्दोष, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
पद्मालय शैक्षणिक संस्थेची सन 1991 मध्ये स्थापना झाली आहे. त्यावेळी पद्मालय संस्थेच्या संचालक मंडळात 11 लोकांचा समावेश होता.
जळगाव : जळगाव (jalgaon) तालुक्यातील म्हसावद (mhsawad) येथील पद्मालय शैक्षणिक संस्थेच्या चेंज रिपोर्टमध्ये संचालकांच्या खोट्या सह्या करून फसवणूक केल्याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil), माजी जि. प. सदस्य प्रताप पाटील यांच्यासह सहाजणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल न्यायाधीश व्ही. सी. जोशी यांनी दिला आहे. हे प्रकरण 2012 सालचं आहे. ज्यावेळी हे प्रकरणं उजेडात आलं होतं. त्यावेळी या प्रकरणाची अधिक चर्चा देखील झाली होती.
नेमकं काय आहे प्रकरण ?
पद्मालय शैक्षणिक संस्थेची सन 1991 मध्ये स्थापना झाली आहे. त्यावेळी पद्मालय संस्थेच्या संचालक मंडळात 11 लोकांचा समावेश होता. विशेष म्हणजे 2008 पर्यंत या संस्थेचे ऑडिट झाले नव्हते. त्यानंतर प्रोसेडिंग बुक तयार करून ठराव मंजूर करण्यात आला. 2008 मध्येच गुलाबराव पाटील यांच्यासह इतरांनी जुने विश्वस्त कमी करून नवीन घेण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यापूर्वी आधीच्या संचालकांना अजेंडा पाठविण्यात आला होता.
खोट्या सह्या करून फसवणूक केल्याचं म्हटले होते
नंतर सन 2012 मध्ये संस्थेचा ठराव झाल्याप्रमाणे संस्थेचे सेक्रेटरी अर्जुन पाटील व गुलाबराव पाटील यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयात चेंज रिपोर्ट दाखल केला. त्यावेळी तो मंजूरही झाला, पण चार महिन्यांनी अर्जुन पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात गुलाबराव पाटील यांच्यासह साधनांची चैन रिपोर्टमध्ये खोट्या सह्या करून फसवणूक केल्याचं म्हटले होते, त्यानुसार गौरव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांच्यासह साजराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
शिंदे गटात दाखल झाल्यानंतर…
गुलाबराव पाटील शिंदे गटात दाखल झाल्यापासून त्यांनी जळगावात भेटी वाढवल्या आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ते भेटी देखील देत आहेत. शिंदे गटात दाखल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना विरोध केला होता. त्याचबरोबर त्यांच्यावर टीका देखील केली होती. परंतु गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील लोकांची मनं जिंकल्याची चर्चा आहे. गुलाबराव पाटील शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांनी जळगावात मोठं शक्ती प्रदर्शन सुध्दा केलं होतं.