‘पहिलं तू सूधर, एमआयएमने पाडून टाकलं’; गुलाबराव पाटलांकडून चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ व्यक्तव्याचा जोरदार समाचार
शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाचं राजकारण सुरूच आहे. चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याचा गुलाबराव पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
मुंबई : शिंदे गट आणि शिवसेनेच्या (Shiv sena) नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाचं राजकारण सुरूच आहे. जर शिंदे गटाचे 50 आमदार निवडून आले तर मी हिमालयात जाईल असं वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. खौरे (Chandrakant Khaire) यांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जोरदार प्रत्युत्ततर दिले आहे. ‘पहिलं तू सुधर म्हणा बाबा, एमआयएमने पाडून टाकलं, लोकांचं काय बघतो’ अशा शद्बात गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना शासनाचा नवा जीआर वंदे मातरम् वर देखील प्रतिक्रिया दिली आहे. वंदे मातरम् म्हणण काय वाईट आहे. तुम्ही ज्या मातीत राहातात तिला नमन करण म्हणजे वंदे मातरम् असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत खैरेंवर घणाघात
सध्या शिवसेना नेते आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं की जर शिंदे गटाचे 50 आमदार निवडून आले तर मी हिमालयात जाईल. आता गुलाबराव पाटलांकडून चंद्रकांत खैरेंच्या या वक्तव्याचा जोरदार समचार घेण्यात आला आहे. ‘पहिलं तू सुधर म्हणा बाबा, एमआयएमने पाडून टाकलं, लोकांचं काय बघतो अशा शद्बात’ गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना खोचक टोला लगावला आहे.
वंदे मातरम् वर प्रतिक्रिया
शासनाकडून नवा जीआर काढण्यात आला आहे. नव्या जीआरनुसार आता शासकीय कर्मचाऱ्यांना फोन उचलल्यानंतर किंवा कोणाला फोन केल्यानंतर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे लागणार आहे. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘वंदे मातरम् म्हणण काय वाईट आहे. तुम्ही ज्या मातीत राहातात तिला नमन करण म्हणजे वंदे मातरम् . इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् बोलना होगा’ असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.