Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपात दोन डझन आमदार राष्ट्रवादीचे; शिवसेनेतही बाहेरचे, आमच्यासारखे एकनिष्ठ थोडेच : गुलाबराव पाटील

"कोणीही ठामपणे सांगू शकत नाही हा माझा पक्ष आहे. सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकीय वाद बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी एक होण्याची गरज आहे" असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले

भाजपात दोन डझन आमदार राष्ट्रवादीचे; शिवसेनेतही बाहेरचे, आमच्यासारखे एकनिष्ठ थोडेच : गुलाबराव पाटील
Gulabrao Patil
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 8:03 AM

जळगाव : “सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. भाजपमध्ये तब्बल दोन डझन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीतही बाहेरचे लोक आमदार आहेत, आमच्यासारखे काही थोडेच एकाच पक्षाचे एकनिष्ठ आहेत” असं वक्तव्य शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं. भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse( आणि भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यावेळी उपस्थित होते. (Gulabrao Patil says two dozen BJP MLAs are from NCP at Jalgaon event)

“राजकीय वाद बाजूला ठेवा”

“कोणीही ठामपणे सांगू शकत नाही हा माझा पक्ष आहे. सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकीय वाद बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी एक होण्याची गरज आहे” असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. भालोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण आणि प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पाला माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

“पक्ष वाढवा, मात्र विकासासाठी एकत्र या”

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, “स्वर्गीय हरिभाऊ जावळे एक अजातशत्रू नेते होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी आपले राजकीय आयुष्य खर्च केले आहे. विकास कामासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज कोणीही एका पक्षाचा सांगू शकत नाही, सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत, भाजपत तब्बल दोन डझन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बाहेरचे लोक आमदार आहेत, आमच्यासारखे काही थोडेच एकाच पक्षाचे एकनिष्ठ आहेत. त्यासाठी आपण विनंती करतो की ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा मात्र विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे” असं आवाहन गुलाबरावांनी केलं.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला

(Gulabrao Patil says two dozen BJP MLAs are from NCP at Jalgaon event)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.