पक्षाचे लोक फोडले जातात, तसेच इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी फोडा; मराठी माध्यमांची पटसंख्या वाढवण्यासाठी गुलाबराव पाटील यांचा वादग्रस्त सल्ला
आज काल कोण करप्ट नाही, आजची सगळी दुनिया करप्ट आहे, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. या देशात एकमेव नॉन करप्ट प्राणी म्हणजे शिक्षक असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांचा उदो उदो देखील केला. मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जळगाव : एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी बंड करत शिवसेना फोडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर त्यांच्यासह गेलेले आमदार हे मंत्री पदावर विराजमान झालेत. आता शिंदे गटाचे आमदार सर्वच ठिकाणी फोडाफोडीची भाषा करताना दिसत आहेत. शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसमोरच फोडाफोडीची भाषा केली आहे. विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांनाच विद्यार्थ्यांची फोडाफोडा करण्याचा अजब सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवायची असेल तर ज्याप्रमाणे पक्षाचे लोक फोडले जातात, तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी फोडा, असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रमुख अथिती म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना गुलाबराव पाटील शिक्षकांना भलताच सल्ला देऊन बसलेत. ज्याप्रमाणे पक्षाचे लोक फोडले जातात, तसेच इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी फोडा अशी आयडिया गुलाबराव पाटील मराठी माध्यमांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना दिली आहे.
ऐवढ्यावरच गुलाबराव पाटील थांबले नाहीत तर त्यांनी भ्रष्टाचाराबाबतही एक धक्कादायक विधान केले. आज काल कोण करप्ट नाही, आजची सगळी दुनिया करप्ट आहे, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. या देशात एकमेव नॉन करप्ट प्राणी म्हणजे शिक्षक असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांचा उदो उदो देखील केला. मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील लोकांना फोडणे, हे फोडाफोडीचे राजकारण राजकीय पक्षांपर्यंत ठीक आहे. मात्र हे राजकारण विद्यार्थ्यांपर्यंत आणणे चुकीचे आहे, अशा शब्दांत अनिल पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये हे दुर्गुण यायला नको, याची आपण दक्षता घ्यावी, असंही ते म्हणाले.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे गुलाबराव पाटील नेहमीच चर्चेत
गुलाबराव पाटील हे गुलाबराव पाटील नेहमीच चर्चेत असताता. शिंदे गटात येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना देखील त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती.