Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपनं बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेबही बेईमान झाले नसते’, गुलाबराव पाटलांची भाजपवर सडकून टीका

जळगाव भाजपने लोकसभा निवडणुकीत चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यावेळी मी स्वत: भाजपकडे तक्रार केली होती. शिवसेनेविरुद्ध बंडखोर उमेदवार देऊन भाजपनं बेईमानी केली, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केलाय.

'भाजपनं बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेबही बेईमान झाले नसते', गुलाबराव पाटलांची भाजपवर सडकून टीका
गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 4:31 PM

जळगाव : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून पूर्वाश्रमीचे मित्रपक्ष राहिलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. जळगाव भाजपने लोकसभा निवडणुकीत चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यावेळी मी स्वत: भाजपकडे तक्रार केली होती. शिवसेनेविरुद्ध बंडखोर उमेदवार देऊन भाजपनं बेईमानी केली, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केलाय. (Gulabrao Patil’s reply to Devendra Fadnavis’s criticism of Uddhav Thackeray)

इतकंच नाही तर त्यावेळी भाजपनं बेईमानी केली नसती तर ही वेळ आली नसती. पहिलं बेईमान कोण हे आधी भाजपनं तपासावं आणि मग बोलावं. पहिले ते बेईमान झाले नसते तर आज ते जसं म्हणत आहेत तसे उद्धव साहेब बेईमान झाले नसते, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी भाजपवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती. राजकारणात महत्वाकांक्षा असणं चुकीचं नाही. मात्र, त्यासाठी मुखवटा परिधान करणं चुकीचं आहे. उद्धव ठाकरे यांनी आता तो मुखवटा उतरावा आणि मान्य करावं त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांच्या या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जळगावातून प्रत्युत्तर दिलंय.

‘..म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले’

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेकडे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते यांसारखे निष्ठावंत असताना त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही? असा सवाल केला होता. त्यावर उत्तर देतांना गुलाबराव पाटील म्हणाले की, हा जर एकट्या शिवसेनेचा प्रश्न असता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. पण हा एकट्या शिवसेनेचा विषय नव्हता. सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले, असं पाटील यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

द्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून डिवचलं होतं. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी केला.

इतर बातम्या :

‘तेरी जुबान कतरना बहुज जरुरी है’, शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानं अमोल मिटकरींचा चंद्रकात पाटलांवर निशाणा

‘कोकणचा ढाण्या वाघ’, रामदास कदमांच्या समर्थनात ठाण्यात पोस्टरबाजी; नेत्यांचे फोटो पण शिवसेनेचा उल्लेख नाही!

Gulabrao Patil’s reply to Devendra Fadnavis’s criticism of Uddhav Thackeray

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.