Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratna Sadavarte : तब्बल 18 दिवसानंतर गुणरत्न सदावर्तेंची सुटका! छाती ठोकत म्हणाले, जय भीम, वंदे मातरम, एसटी कामगार

संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास गुणरत्न सदावर्ते यांना आर्थर रोड कारागृहातून बाहेर सोडण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि वकील जयश्री पाटील, तसंच मुलगी झेन हे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. कारागृहातून बाहेर येताच सदावर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Gunratna Sadavarte : तब्बल 18 दिवसानंतर गुणरत्न सदावर्तेंची सुटका! छाती ठोकत म्हणाले, जय भीम, वंदे मातरम, एसटी कामगार
गुणरत्न सदावर्ते यांची जामिनावर सुटकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 7:49 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर एसटी कामगारांचा न्यायालयीन लढा लढणारे गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सुरू झालेली जेलवारी तब्बल 18 दिवस चालली. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सातारा आणि कोल्हापूरातील त्यांच्यावर दाखल गुन्ह्याबाबत त्यांनी पोलीस कोठडी (Police Custody) आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्यांचा जेलमधील मुक्काम वाढला. त्यानंतर आज सदावर्ते यांना अटकेुपासून दिलासा मिळाला. त्यानंतर संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास गुणरत्न सदावर्ते यांना आर्थर रोड कारागृहातून बाहेर सोडण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि वकील जयश्री पाटील, तसंच मुलगी झेन हे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. कारागृहातून बाहेर येताच सदावर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच आपली पुढील वाटचाल आणि लक्ष्यही सांगून टाकलं.

‘विजय हिंदुस्थानी नागरिकांचा, एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांचा’

कारागृहातून बाहेर आल्यानंतर सदावर्ते यांनी हम है हिंदुस्थानी अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘भारताच्या संविधानापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. ही आहे झेन सदावर्ते माझी 13 वर्षाची मुलगी आणि ही आहे माझी पत्नी जयश्री पाटील आणि या मित्र परिवाराने या अन्यायाविरोधात मला साथ दिली. महाराष्ट्रातील देशातील हिंदुस्थानी कष्टकरी हे आमच्या सोबत राहिले. यापुढे आमचा केंद्र बिंदू असेल भ्रष्टाचार, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करु. परंतू जय श्रीराम म्हणणारे, जय भीम म्हणणारे आणि वंदे मातरम म्हणणारे, हम है हिंदुस्थानी म्हणणारे जिंकत असतात. हा विजय हिंदुस्थानी नागरिकांचा, एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांचा आहे. पुढेही बोलू आता तूर्त इतकंच’, असं म्हणत सदावर्ते गाडी बसले आणि आपल्या घराकडे निघून गेले. मात्र, पुढे आपण बोलणार असल्याचंही सदावर्ते यांनी जाहीर केलंय.

जेलमधील 18 दिवस कसे गेले?

गुणरत्न सदावर्ते यांनी आपले जेलमधील 18 दिवस कसे गेले हे देखील सांगितलं. ‘मी पहिल्यांदा पोलीस कस्टडीत होतो तिथे एक पोलीस शिपायाचा जीव वाचवू शकलो. तिथे एका पोलीस शिपायाला हृदयविकाराचा झटका आला होता. कोणत्याही फौजदाराला प्रथमोपचार माहिती नव्हते. मी त्यांना आर्टिफिशियल रेस्पिरेशन देऊन वाचवू शकलो. मी ज्या ज्या लॉकअपमध्ये गेलो तिथे त्यांना योगाचं शिक्षण दिलं. मी स्पिरिच्यूअल टॉक केले. मला एक माहिती तुम्ही कुठेही जा, तुम्ही वाईटातील वाईट बाजूला करुन चांगल्यांना चांगलं शिकवू शकता. हे मी 18 दिवसांत अनुभवलं’, असंही सदावर्ते यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते तब्बल 18 दिवसांनंतर कारागृहाबाहेर! हम है हिंदुस्थानी, सदावर्तेंची घोषणाबाजी

Sanjay Raut on Rana : राणा प्रकरणात विरोधी पक्ष उघडा पडला, राणा दाम्पत्याच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर राऊतांचा भाजपवर निशाणा

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.