Gunratna Sadavarte : ‘सुबह का भुला शाम को…’ सदावर्ते यांना ठाकरेंकडून एकच अपेक्षा! ती नेमकी कोणती?

| Updated on: Apr 27, 2022 | 11:29 AM

Video : स्टेट इमरजन्सी सारखं सरकारचं वर्तन नसाव, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

Gunratna Sadavarte : सुबह का भुला शाम को... सदावर्ते यांना ठाकरेंकडून एकच अपेक्षा! ती नेमकी कोणती?
गुणरत्न सदावर्ते यांचा जामीन रद्द करण्याची मागणी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : 18 दिवसांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह  (TV9 Marathi Exclusive) बातचीत केली. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर भाष्य केलं. सुबह का भुला, शाम को लौट आए, तो उसे भुला नहीं कहते, असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर म्हटलंय. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून एक अपेक्षा आहे, असं म्हणत त्यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या आणीबाणी सारख्या काळात जसं वातावरण होतं, तसं वातावरण असल्याचं भासत असल्याची खंत सदावर्ते यांनी व्यक्त केली. राज्यात आणीबाणी असल्यासारखं सरकारचं वर्तन नसावं, असंही त्यांनी म्हटलंय. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मला अपेक्षा आहे. इतर कुणाकडून मला ती अपेक्षा नाही, असंही त्यांनी म्हटलंय. कारागृहातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच गुणरत्न सदावर्ते यांनी सविस्तर भाष्य केलंय.

वाचा नेमकं सदावर्ते काय म्हणाले?

टीव्ही 9 मराठीसोबत लाईव्ह बातचीत करतेवेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय, की

नेल्सन मंडेलांना सुद्धा अपराधी दाखवलं होतं.. राईट टू लिबर्टीचा विषय होता..
इंदारजींनी या देशाच्या पत्रकारांनी सेन्सॉरशिप करुनही तसंच दाखवलं होतं.

आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत.. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत…
सरकारनं आपल्या वागण्याचा थोडा विचार करावा…

कोणत्याच विध्वंसाचं आम्ही समर्थन करत नाही…
एक वाळूचा खडातरी कुणाला मारलेला दिसतोय का…

स्टेट इमरजन्सी सारखं सरकारचं वर्तन नसाव..
माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ती अपेक्षा आहे.. इतर कुणाकडून मला ती अपेक्षा नाही..
कष्टकरी कुटुंबातल्या लोकांनी नीट समजून घ्यावं..
सुबह का भुला शाम को लौट आए तो उसे भुला नहीं करते..

अखेर बाहेर आले…

गुणरत्न सदावर्ते यांना शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्लाप्रकरणानंतर ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची रवानगी सातारा पोलिसाांच्या ताब्यात होती. मग तिथून त्यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला होता.

दरम्यान, यानंतर कोल्हापूर आणि साताऱ्यातून जामीन मिळाल्यानंतर सदावर्ते यांना आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आलं होतं. तिथेही खरंतर पुणे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आले होते. पण पुण्यापाठोपाठ सोलापुरातूनही सदावर्ते यांना जामीन मिळाला. त्यानंतर अखेर 18 दिवसांनंतर गुणरत्न सदावर्ते हे कोठडीतून बाहेर आले होते.

कोठडीतून बाहेर आल्यानंतर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया काय होती? : पाहा व्हिडीओ