‘काँग्रेसशी हातमिळवणी केली, ही सर्वात मोठी चूक’; कुमारस्वामी यांच्या वक्तव्याने कर्नाटकमध्ये खळबळ

काँग्रेसशी हातमिळवणी करुन राज्यात सरकार स्थापन केलं, ही चूक हेती. अशी कबुली एच. डी. कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी दिली. (Kumaraswamy Congress government)

'काँग्रेसशी हातमिळवणी केली, ही सर्वात मोठी चूक'; कुमारस्वामी यांच्या वक्तव्याने कर्नाटकमध्ये खळबळ
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 4:27 PM

बंगळुरु :काँग्रेसशी हातमिळवणी करुन राज्यात सरकार स्थापन केलं, ही चूक हेती. यामुळे 12 वर्षांपासून आमच्या पक्षावर असेलला जनतेचा विश्वास आम्ही गमावला,’ अशी कबुली कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकमधील राजकीय गोटात खळबळ ऊडाली आहे. (h d kumaraswamy said that it was wrong decision to form government with congress)

एच. डी. कुमारस्वामी (HD Kumaraswamy on Congress) म्हणाले, “आम्ही जाळ्यात फसलो. भाजपपेक्षाही जास्त विश्वासघात काँग्रेस पक्षाने केला.” त्यांच्या या आरोपानंतर काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी प्रत्यूत्तर म्हणून, “कुमारस्वामी खोटं बोलण्यात अगदी पटाईत आहेत. अश्रू ढाळण्याची त्यांच्या परिवाराची ही जुनीच सवय आहे,” असं म्हटलं आहे.

कुमारस्वामी यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप

एच. डी. कुमारस्वामी म्हणाले, “2006-07 साली राज्याचा मुख्यमंत्री असताना मी जनतेचा विश्वास संपादन केला होता. जनतेच्या या विश्वासाला तब्बल बारा वर्षांपर्यंत मी सांभाळलं. काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यामुळे जनतेच्या मनात असणारा हा सगळा विश्वास आम्ही गमावून बसलो आहोत.” तेसच, ज्या पक्षाने आम्ही (जनता दल सेक्यूलर) भाजपीची बी टीम असल्याचा आरोप केला. त्या पक्षासोबत आम्ही हातमिळवणी करायला नको होती, असेही कुमारस्वामी म्हणाले.

कर्नाटकात 2018 मध्ये काँग्रेस-जद (से) सरकार

कर्नाटकमध्ये 2018 च्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणतच्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. याच करणामुळे निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीका करणारे जद (से) आणि काँग्रेस सोबत आले. हातमिळवणी करुन त्यांनी कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची बहाल करण्यात आली. या पक्षांनी मागील वर्षी झालेली लोकसभा निवडणूकही सोबत लढवली. मात्र , त्यानंतर दोन्ही पक्षात मतभेद झाल्याने काही आमदार फुटले आणि कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी सरकार पडले.

त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेससोबत सरकार स्थापन करुन चूक केल्याचं सांगितलं. तेसच, या चुकीमुळे आम्ही जनतेचा विश्वास गमावला, अशी जाहीर कबुलीही कुमारस्वामी यांनी दिली.

दरम्यान, या आरोपांनंतर काँग्रेसनेदेखील कुमारस्वामी यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामी खोटं बोलण्यात माहीर असल्याचा आरोप केला आहे. “जद (से) ला विधानसा निवडणुकीत फक्त 37 जागा मिळाल्या. एवढ्या कमी जागा असतानादेखील आम्ही त्यांनी मुख्यमंत्रिपद दिलं, ही आमची चूक होती का?” असा प्रतिप्रश्न त्यांनी कुमारस्वामी यांना केला.

संबंधित बातम्या :

‘दम असेल तर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची असेल तर तीही द्या’, तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार

Corona | मास्क वापरा अन्यथा होणार खुल्या तरुंगात रवानगी, शिक्षाही ठरली

(h d kumaraswamy said that it was wrong decision to form government with congress)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.