‘ते’ संविधान निवडणूक आयोगाला दिलं असतं तर ही वेळ आली नसती?; राहुल नार्वेकर यांचं दोनच वाक्यात उत्तर काय?

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल दिल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी टीव्ही 9 मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्याशी बातचीत केली. यात त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या 2018 सालच्या घटना दुरुस्तीचे काही डॉक्युमेंट नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे साल 1999 सालची घटनाच आधारभूत मानण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

'ते' संविधान निवडणूक आयोगाला दिलं असतं तर ही वेळ आली नसती?; राहुल नार्वेकर यांचं दोनच वाक्यात उत्तर काय?
rahul narvekar
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 7:20 PM

मुंबई | 11 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली आहे. टीव्ही 9 मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली. देशभर चर्चेत असलेल्या आमदार अपात्रतेच्या निकालावर विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली आहेत. या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना अशी मान्यता कालच्या निकालाद्वारे मिळाली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यावर उद्धव ठाकरे गटाने चौफेर टीका केली आहे. यावर बोलताना आपण कायद्याप्रमाणे निकाल दिला असून कोणाला चांगला किंवा वाईट वाटेल म्हणून निकाल दिलेला नसल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणाचा जवळपास 1200 पानांचा निकाल काल वाचून दाखविला आहे. या निकालात बहुमत शिवसेना एकनाथ गटाकडे होते म्हणून हा निकाल दिला काय ? याप्रश्नावर राहुल नार्वेकर यांनी माझा मुख्य मुद्दा हा ट्रिपल टेस्टचा आहे. कोर्टाने सांगितलं घटना पाहा शिवसेना पक्षाच्या १९९९च्या घटनेत स्पष्टता नव्हती. त्यात वाद होता. आणि शिवसेना पक्षाची २०१८ ची घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरच नव्हती. २०१८ चे असं कोणते डॉक्यूमेंटच आमच्याकडे नाही असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे आमच्याकडे दाखल केलेले नाही आणि आम्ही रेकॉर्डवर घेतलेले नाही. घटने संदर्भात वाद असेल तर वाद सुरू होण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे जी घटना असेल ती ग्राह्य धरा, असं कोर्टाने म्हटलं असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

२०१८ ला जर यांनी आयोगाकडे घटना दिली असतं तर…

राहुल नार्वेकर यांनी या जर निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर २०१८ची घटना असती तर निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तरात सांगितले असते. शिवसेना पक्षाच्या १९९९च्या घटनेत २०१८ मध्ये सुधारणा झाली आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले असते. आता हे सुधारीत अमेंडमेंट हे शिवसेनेची अधिकृत घटना आहे असे म्हटले असते. आमच्याकडे उपायच राहिला नसता त्या व्यतिरिक्त काही पाहता आलंच नसतं असेही राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.