Hanuman Chalisa controversy: राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर केले, सुनावणीपूर्वी नवनीत राणांवर आणखी एक गुन्हा दाखल

मुंबईमध्ये हनुमान चालीसेवरून (Hanuman Chalisa controversy) मोठा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या गोंधळानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवि राणा (Ravi Rana) यांना काल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज बांद्रा कोर्टात हजर करण्यात आले आहे.

Hanuman Chalisa controversy: राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर केले, सुनावणीपूर्वी नवनीत राणांवर आणखी एक गुन्हा दाखल
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 12:10 PM

मुंबई : मुंबईमध्ये हनुमान चालीसेवरून (Hanuman Chalisa controversy) मोठा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या गोंधळानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवि राणा (Ravi Rana) यांना काल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज बांद्रा कोर्टात हजर करण्यात आले आहे. मात्र सुनावणीपूर्वीच नवनीत राणा यांना आणखी एक धक्का बसला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कलम 353 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवणीत राणा यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे, या प्रकरणात नवनीत राणा यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा वाचणारच असे नवनीत राणा यांनी म्हटले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक आमने -सामने आल्याचे पहायला मिळाले. शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या राड्यानंतर अखेर नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आले. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

गृहमंत्री काय म्हणाले?

नवनीत राणा आणि त्यांचे पती रवि राणा यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. वळसे पाटील यांनी म्हटले होते की, हनुमान चालीसेच्या आडून दंग भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाई होईल. त्यानंतर नवनीत राणा आणि रवि राणा यांना अटक करण्यात आली. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे.

सोमय्या यांच्यावरील हल्ल्याच्या चौकशीचे आदेश

दरम्यान दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील काल हल्ला झाला. या हल्ल्यावर देखील वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात देखील चौकशीचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले आहे. तर माझ्यावर जो काल हल्ला झाला, त्याला पोलीसच जबाबदार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. पोलिसांनी जर सुरक्षेची जबाबदारी घेतली होती तर इतके लोक एकाचवेळी कसे जमा झाले असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच पोलिसांनी बनावट एफआयआर दाखल केल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला.

संबंधित बातम्या

Sanjay Raut: लोकशाही धोक्यात येण्यास अपरिपक्व विरोधी पक्षच जबाबदार; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Dilip Walse Patil On Somaiya: किरीट सोमय्यांनी संघर्ष वाढवायला नको होता: दिलीप वळसे पाटील

Nashik Ajit Pawar : काय करायचं ते तुम्ही तुमच्या घरासमोर करा ना बाबा…; ‘मातोश्री’बाहेरच्या प्रकारावर अजित पवारांची नाराजी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.