हार्दिक पटेलच्या काँग्रेस प्रवेशाची तारीख आणि लोकसभा मतदारसंघ ठरला

अहमदाबाद : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल 12 मार्च रोजी काँग्रेसमधून प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत हार्दिक पटेल काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारणार आहे. गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची त्याची इच्छा आहे. जामनगरमध्ये सध्या भाजपच्या पुनमबेन मादम या खासदार आहेत. अहमदाबादमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर हार्दिक पटेलचा काँग्रेस प्रवेश होऊ शकतो. […]

हार्दिक पटेलच्या काँग्रेस प्रवेशाची तारीख आणि लोकसभा मतदारसंघ ठरला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

अहमदाबाद : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल 12 मार्च रोजी काँग्रेसमधून प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत हार्दिक पटेल काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारणार आहे. गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची त्याची इच्छा आहे. जामनगरमध्ये सध्या भाजपच्या पुनमबेन मादम या खासदार आहेत.

अहमदाबादमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर हार्दिक पटेलचा काँग्रेस प्रवेश होऊ शकतो. सूत्रांच्या मते, यानंतर जाहीर सभाही घेतली जाईल. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृहराज्य आहे. त्यामुळे काँग्रेसने गुजरातवर पूर्ण लक्ष केंद्रीत केलंय. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला घाम फोडला होता. सत्ता राखण्यात भाजपला यश आलं असलं तरी काँग्रेसने टक्कर दिली होती.

पाटीदार आरक्षणासाठी हार्दिक पटेलने लढा उभारला होता. हार्दिक पटेलसोबतच पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी स्थापन केलेल्या समितीचे आणखी पाच सदस्यही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. गुजरातमधील काँग्रेस नेत्यांशी भेटून चर्चा करणार असल्याचं हार्दिक पटेलने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं.

लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींच्या उपस्थितीत गुजरात कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन 28 फेब्रुवारीला करण्यात आलं होतं. पण भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पुढे ढकलण्यात आली. ही बैठक आता 12 मार्चला होत आहे. या बैठकीनंतर प्रियांका गांधी त्यांचं महासचिव बनल्यानंतरचं भाषणही देऊ शकतात. याच बैठकीत हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

तुमच्या मतदारसंघात कधी मतदान? पाहा इथे

विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागा मिळवूनही काँग्रेससाठी गुजरातमध्ये डोकेदुखी वाढली आहे. कारण, 77 जागा जिंकलेल्या काँग्रेसचा आकडा आता 74 वर आलाय. कारण, एका आमदाराने पक्षाला रामराम ठोकला, तर एका आमदाराने भाजपात प्रवेश केला, शिवाय एका आमदारावरील गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्याला अपात्र घोषित करण्यात आलंय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.