कट्टर विरोधक अजित पवारांशी अर्धा तास गप्पा, हर्षवर्धन पाटील म्हणतात…

अजित पवार यांच्याशी माझी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, योगायोगाने आम्ही शेजारी आलो होतो, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले

कट्टर विरोधक अजित पवारांशी अर्धा तास गप्पा, हर्षवर्धन पाटील म्हणतात...
Follow us
| Updated on: Dec 25, 2019 | 4:16 PM

पुणे : भाजपवासी झालेले काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी तसेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार शेजारी बसून गप्पा मारताना दिसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढूनही आमदारकी मिळवता न आलेले हर्षवर्धन पाटील आता राष्ट्रवादीच्या गोटात सहभागी होणार का, याची चर्चा रंगली आहे. मात्र हर्षवर्धन पाटलांनी या चर्चांना पूर्णविराम (Harshwardhan Patil on meeting Ajit Pawar) दिला आहे.

अजित पवार यांच्याशी माझी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, योगायोगाने आम्ही शेजारी आलो होतो, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. अजित पवार यांच्याशी माझी साखर कारखानदारी, शेती याच विषयावर चर्चा झाली. आमच्यात कोणत्याही राजकीय गप्पा झाल्या नाहीत. माझा परत फिरण्याचा कुठलाही विचार नाही, असं हर्षवर्धन पाटलांनी स्पष्ट केलं.

नवीन सरकारने काय करावं, सहकार मंत्रालयाचा तुमचा अनुभव कसा होता, याविषयी अजित पवारांनी विचारल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं. शरद पवार, बाळासाहेब थोरात यासारखे नेतेही भेटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपली भेट झाली. हा राजकीय पक्षाचा कार्यक्रम नव्हता, गव्हर्निंग कौन्सिलचा होता, असंही पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची लेट एण्ट्री, पवारांसह दिग्गज नेते ताटकळत, हर्षवर्धन पाटील-अजित पवारांच्या तासभर गप्पा

मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूमध्ये सर्वोकृष्ट साखर कारखाना पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हेसुद्धा उपस्थित होते.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे कट्टर विरोधक अजित पवार यांच्यात जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गप्पा सुरु होत्या. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा राज्याने पाहिला होता. अशात दोघांमध्ये गप्पा रंगल्याने सर्वच बुचकळ्यात पडले.

लोकसभेत सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊनही, राष्ट्रवादीने विधानसभेला इंदापूरची जागा आपल्याला सोडली नसल्याचा आरोप करत, हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्ष सोडताना त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड केली होती. मात्र इंदापुरात भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवूनही हर्षवर्धन पाटलांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का बसला. मात्र त्यांची कन्या अंकिता पाटील काँग्रेसमध्येच आहे.

Harshwardhan Patil on meeting Ajit Pawar

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.