Special Story: ग्रामपंचायत निवडणुकीत शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे उजळलेत का?

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढूनही शिवसेनेला यश मिळालं नव्हतं. (Shivsena get benefit in Gram panchyat Election 2021)

Special Story: ग्रामपंचायत निवडणुकीत शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे उजळलेत का?
शरद पवार, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 11:11 AM

मुंबई: ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Gram panchyat Election) लागले आहेत. या निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तर, राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावून महाविकास आघाडीतील आपल्या मित्र पत्रक्षांनाही चकीत केलं आहे. राष्ट्रवादीनंतर अर्थातच शिवसेना (Shivsena) तिसऱ्या आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेला आहे. राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवून ग्रामीण भागात आपली पाळंमुळं मजबूत असल्याचं दाखवून दिलं आहे. तर, तुल्यबळ जागा मिळवत शिवसेनेनेही आपल्या पक्षाचा तोंडवळा शहरी नसून ग्रामीण भागातही आपल्याला मोठा जनाधार असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापेक्षा अधिक उजळले आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचा घेतलेला हा धांडोळा. (Shivsena get benefit in Gram panchyat Election 2021)

आकडे काय सांगतात?

ग्रामपंचायतीच्या 1600 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक जागांवर शिवसेना जिंकलेली आहे. उरलेल्या 13,833 जागांपैकी 13,769 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. काही जागांचे निकाल तांत्रिक कारणामुळे रखडले आहेत. जाहीर झालेल्या निकालांपैकी भाजपने 3,263, राष्ट्रवादीने 2,999, शिवसेनेने 2,808, काँग्रेसने 2,151, मनसेने 38 आणि स्थानिक गटांनी 2,510 जागा जिंकल्या आहेत. या निकालावरून महाविकास आघाडी आणि युती अशी तुलना केल्यास महाविकास आघाडीला सर्वाधिक म्हणजे सुमारे 8 हजाराहून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर युतीकडे तीन हजाराहून अधिक जागा आलेल्या दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने मैदान मारल्याचं दिसून येत आहे. परंतु, राजकीय पक्षनिहाय विचार करता सर्वाधिक जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत.

दोन गोष्टी

या निवडणुकीत दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. एक म्हणजे महाविकास आघाडीच्या मतदारांनी एकमेकांना मतदान केलंय. परस्पर विरोधी विचारांच्या पक्षांनी एकमेकांना मतांचं ट्रान्स्फर केल्याचं या निवडणुकीतून सिद्ध झालं आहे. शिवसेनेचे मतदार काँग्रेसला आणि काँग्रेसचे मतदार शिवसेनेला मतदान करतील की नाही याबाबत साशंकता होती. पण दोन्ही पक्षांच्या मतदारांनी एकमेकांना मतदान करून आघाडीवरील विश्वास दाखवून दिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आघाडीतील मित्र पक्षांचं समर्थन असणाऱ्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र, तरीही हे उमेदवार भाजप समर्थित उमेदवारांवर भारी पडल्याचं दिसून आलं आहे.

युतीतून बाहेर पडल्याने नुकसान नाही

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढूनही शिवसेनेला यश मिळालं नव्हतं. पण ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे युतीतून बाहेर पडल्याने शिवसेनेचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचं दिसून आलं आहे. युतीतून बाहेर पडल्याने शिवसेनेच्या हिंदू व्होट बँकवर परिणाम होईल असं सांगतिलं जात होतं. पण या व्होट बँकेवर काहीही परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं आहे.

आघाडीत शिवसेना मजबूत

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने शिवसेनेची व्होटबँक घटण्याऐवजी वाढलीच आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक ही मिनी विधानसभेची निवडणूक मानली जाते, अशावेळी शिवसेनेचं यश पाहता शिवसेनेचा या निवडणुकीने फायदाच झाल्याचं दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलं यश मिळवून शिवसेनेने भाजपची डोकेदुखी वाढवलेली असतानाच आघाडीतही आपला पक्ष मजबूत असल्याचं शिवसेनेने दाखवून दिलं आहे. शिवसेनेने अनेक वर्षांपासूनच्या शत्रू असलेल्या दोन्ही काँग्रेससोबत युती केल्यानंतरही शिवसेनेची व्होटबँक घटण्याऐवजी वाढली आहे. ग्रामीण भागात वर्चस्व असलेल्या दोन्ही काँग्रेसच्या बरोबरीने शिवसेनेने यश मिळवलं आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेससाठीही शिवसेना आगामी काळात आव्हान ठरणार आहे.

भाजपला धोक्याची घंटा

भाजपसोबत युतीत असताना ग्रामीण भागात शिवसेनेला फारसं यश मिळत नसायचं. शहरी तोंडवळा असलेली पार्टी म्हणून शिवसेनेची बोळवण केली जायची. पण महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर शिवसेनेने 2,808 जागा जिंकून भाजपच्या व्होटबँकेलाच सुरुंग लावला आहे. आधी विधानपरिषदेत भाजपला झटका दिला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 8 हजाराच्यावर जागा जिंकून भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे भाजपला पारंपारिक राजकारणाला फाटा देऊन युतीचं राजकारण करण्याशिवया पर्याय उरलेला नाही.

पवार-ठाकरे तुलना करणं चुकीचं

ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. त्या मुक्त चिन्हांवर लढल्या जातात. स्थानिक आघाड्यांमार्फत निवडणूक लढवली जाते. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या यशापयशाची तुलना करणं चुकीचं ठरेल. कल्याण-डोंबिवली महापालिका, नवी मुंबई, वसई-विरार महापालिका निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या दहा महापालिकांच्या निवडणुकीतील यशापयशावरूनच या दोन्ही नेत्यांची तुलना करता येईल. आता अशी तुलना करणं योग्य होणार नाही, असं दैनिक महानगरचे संपादक संजय सावंत यांनी सांगितलं. (Shivsena get benefit in Gram panchyat Election 2021)

ग्रामपंचायतीत सेनेचा फायदाच

ग्रामपंचायत निवडणुकीत नेहमी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदारांचा कल असतो. खासकरून मुख्यमंत्र्यांकडे पाहून मतदान होतं. सत्ताधाऱ्यांकडून गावाच्या विकासासाठी निधी मिळेल, गावाची कामं मार्गी लागतील या हेतूने मतदारांना सत्ताधाऱ्यांना कौल देतात. पूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्यांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र असायचे. तर काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असायचे. यावेळी तिन्ही पक्ष आघाडी म्हणून एकत्र होते. त्याचा शिवसेनेलाच फायदा झाला. पण तरीही या निवडणुकीत पवार वरचढ ठरले की मुख्यमंत्री ठाकरे हा निष्कर्ष काढता येणार नाही, असंही संजय सावंत यांनी स्पष्ट केलं. (Shivsena get benefit in Gram panchyat Election 2021)

संबंधित बातम्या:

दोन फोटो जे मराठी माणसाला हवेहवेसे वाटणारे!

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेचा श्रीमंत सोहळा

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण; उद्धव ठाकरे म्हणतात…

(Shivsena get benefit in Gram panchyat Election 2021)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.