Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पडळकर, रात्रभर झोप येणार नाही अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ, हसन मुश्रीफ यांचा दम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना एकेरीवर आल्याचं पाहायला मिळालं (Hasan Mushrif on Gopichand Padalkar).

पडळकर, रात्रभर झोप येणार नाही अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ, हसन मुश्रीफ यांचा दम
Follow us
| Updated on: Jun 28, 2020 | 4:29 PM

कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना एकेरीवर आल्याचं पाहायला मिळालं (Hasan Mushrif on Gopichand Padalkar). गोपीचंद पडळकरांना अशा ठेवणीतीली शिव्या देऊ की त्यांना रात्रभर झोप येणार नाही, असा इशाराही यावेळी मुश्रीफ यांनी दिला. त्यांनी पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी त्यांनी यामागे बोलावते धनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असल्याचाही आरोप केला.

हसन मुश्रीफ म्हणाले, “मी यांना या निमित्ताने इतकंच सांगेल की शिव्यांची मालिका आता सुरु झाली आहे. आता आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोपा येणार नाही. यांना रात्री जागून काढाव्या लागतील. अशा प्रकारची पद्धत या राज्यात सुरु झाली आहे. कायदा सुव्यवस्था देखील यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असतील.”

“बिनलायकीचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्याविषयी जी व्यक्तव्यं केली त्याचा मी निषेध करतो. या वक्तव्यांचे बोलवते धनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. हे सांगण्यासाठीच मी ही पत्रकार परिषद घेतली आहे,” असं मुश्रीफ म्हणाले.

हसन मुश्रीफ म्हणाले, “एक दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील आपल्या मुलाखतीत शरद पवारांचा संदर्भ देणे आणि दुसऱ्याच दिवशी पडळकरांनी पवारांवर असं वक्तव्य करणं हा योगायोग नाही. यानंतर फडणवीस पडळकरांचं वक्तव्यं चुकीचं असल्याचं सांगतात. तसेच ते भावनेच्या भरात बोलल्याचं म्हणतात. चंद्रकांत पाटील त्यांच्याबाबत देखील अशी विधानं झाल्याचं सांगतात. मात्र, महाराष्ट्रात अशा प्रकारची विधानं कधीही झालेली नाहीत”.

“नथुराम गोडसेप्रमाणे गोपीचंद पडळकर यांचं उदात्तीकरण”

हसन मुश्रीफ म्हणाले, “कितीही टोकाचे मतभेद असले, संघर्ष असला, राजकीय अभिनिवेश असला तरी अशा प्रकारची वक्तव्यं कधीही आलेली नाहीत. शरद पवार यांनी अशाप्रकारचे काही वक्तव्यं झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माफी तर मागायला लावलीच, पण पक्षातूनही हकालपट्टी केली. त्यांना घरचा रस्ता दाखवला. आमची अपेक्षा होती की भाजपचे हे नेते गोपीचंद पडळकर यांना माफी मागायला लावतील. त्यांना पक्षातून काढून टाकतील. मात्र, त्यांनी तसं न करता पडळकरांचं समर्थन केलं.”

“ज्या पद्धतीने महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेचं उदात्तीकरण चालू आहे, त्याच पध्दतीचं गोपीचंद पडळकर यांचं उदात्तीकरण केलं जातंय. त्यामुळे शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या आमच्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांचं रक्त सळसळू लागलंय,” असंही मुश्रीफ म्हणाले.

हेही वाचा :

नो कमेंट, नो कमेंट, मी काही बोलणार नाही, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची प्रतिक्रिया

कशाला बोलायचं, अनेकवेळा डिपॉझिट जप्त केलंय, शरद पवारांची पडळकरांवर पहिली प्रतिक्रिया

Hasan Mushrif on Gopichand Padalkar

पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.