Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांनी सोडला सरकारी बंगला, निवासाची मोफत व्यवस्था होत असल्याने रुग्णांचे नातेवाईक भावूक
माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी अखेर सरकारी बंगला सोडला आहे. हसन मुश्रीफ यांच्या सरकारी बंगल्यात रुग्णांच्या उपचारासाठी आलेल्या नातेवाईकांची मोफत राहण्याची सोय करण्यात येत होती.
मुंबई : माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी अखेर सरकारी बंगला सोडला आहे. हसन मुश्रीफ यांच्या सरकारी बंगल्यात रुग्णांच्या उपचारासाठी आलेल्या नातेवाईकांची मोफत राहण्याची सोय करण्यात येत होती. मात्र राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळून भाजप (BJP), शिंदे गटाचे सरकार आले आहे. सत्ता गेल्यामुळे हसन मुश्रीफ यांनी सरकारी बंगला सोडला. सरकारी बंगला सोडतानाचे दृष्य हे मोठे भावूक करणारे होते. मुश्रीफ यांच्या बंगल्यात राहणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बंगला सोडताना मुश्रीफ यांचे आभार मानले. राज्यात सत्ता बदल होऊन देखील महाविकास आघाडीमधील अनेक माजी मंत्र्यांनी बंगले सोडले नव्हते त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. अखेर आता माजी मंत्र्यांकडून सरकारी बंगले (Bungalow) खाली करण्यास सुरुवात झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी आपला बंगला सोडाला आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांनी मानले आभार
दरम्यान हसन मुश्रीफ यांना जो सरकारी बंगला देण्यात आला होता, त्या बंगल्यात त्यांनी रुग्णांच्या उपचारासाठी आलेल्या नातेवाईकांची मोफत राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र राज्यात सत्ता बदल झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात भाजपा, शिंदे गटाचे सरकार आले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घतली. नवे सरकार आल्यानंतरही अनेक माजी मंत्र्यांनी बंगले सोडले नव्हते त्यामुळे त्यांच्यावर टीका सुरू झाली होती. अखेर आता माजी मंत्र्यांनी बंगले सोडण्यास सुरुवात केली असून, हसन मुश्रीफ यांनी आपला बंगला सोडला आहे.
अनेक मंत्र्यांनी सोडला नव्हता बंगला
राज्यात सत्ता परिवर्तन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वखालील सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकार आले. दरम्यान नवे सरकार आल्यानंतर देखील अनेक माजी मंत्र्यांनी बंगले सोडले नव्हते त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर निशाणा साधण्यात येत होता. अखेर आता माजी मंत्र्यांनी बंगले सोडण्यास सुरुवात केली असून, हसन मुश्रीफ यांनी आपला बंगला सोडाला आहे.