कोरोना काळात राजेश टोपेंचं काम कौतुकास्पद, खासदार सुप्रिया सुळेंचं प्रशस्तीपत्र
राजेश टोपे हे डॉक्टर नाही ते इंजिनिअर आहेत. टोपे यांना कोणतीही जबाबदारी दिली तरी ते चांगलं काम करतात. मात्र, कोरोनाच्या काळात टोपे यांनी जे काम केलं ते कौतुकास्पद आहे. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी टोपे यांचं कौतुक केलं आहे. कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारनं चांगलं काम केलं, असंही सुळे म्हणाल्या.
पुणे : राज्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला तोंड देताना राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला होता. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भूमिका अत्यंत महत्वाची मानली गेली. कोरोना संकटाच्या काळात राजेश टोपे यांच्या आई गंभीर आजारी होत्या. अशावेळी आईच्या आरोग्याची काळजी घेत टोपे सातत्यानं कामात व्यस्त होते. याच दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू झाला. मात्र, खचून न जाता टोपे यांनी आपली भूमिका सार्थपणे निभावली आहे. टोपे यांच्या कामाचं कौतुक विरोधी पक्षातील नेत्यांनीही केलं आहे. त्याचबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही टोपे यांना चांगल्या कामाचं प्रशस्तीपत्र दिलं आहे. (Health Minister Rajesh Tope’s appreciation from MP Supriya Sule)
राजेश टोपे हे डॉक्टर नाही ते इंजिनिअर आहेत. टोपे यांना कोणतीही जबाबदारी दिली तरी ते चांगलं काम करतात. मात्र, कोरोनाच्या काळात टोपे यांनी जे काम केलं ते कौतुकास्पद आहे. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी टोपे यांचं कौतुक केलं आहे. कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारनं चांगलं काम केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचे आभार. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झालं आहे आणि हे मी नाही तर केंद्र सरकारचा रिपोर्ट सांगत असल्याचंही सुळे यावेळी म्हणाल्या.
तिसरी लाट आली तरी सरकार तयार- टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चर्चेवर भाष्य केलं आहे. नीती आयोगाने कोरोनाची जी तिसरी लाट येणार असल्याचे म्हटले होते. नीती आयोगाच्या पत्राची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नीती आयोगाचे जून महिन्यातील पत्र असून त्यावरुन सध्या चर्चा सुरु असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. आपल्याला सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही. तरी, पण आपण तिसऱ्या लाटेचा अंदाज घेत आहोत. राज्य शासन तिसरी लाट आली तरी तयार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते आज जालन्यात बोलत होते.
शाळा महाविद्यालय कधी उघडणार
राज्यातील मंदिरे आणि शाळा कॉलेज सध्या तरी उघडण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊनच मंदिर आणि शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
जनआशीर्वाद यात्रेतील गर्दी टाळावी
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कुठल्याही बाबतीत गर्दी टाळली पाहिजे, असे आवाहन केले आहे.
इतर बातम्या :
Dahi Handi : जीव वाचवण्यासाठी सण-वार काही काळ बाजूला ठेवू, मुख्यमंत्र्यांचं गोविंदा पथकांना आवाहन
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचा मोठा निर्णय, NBF ला स्वयंनियमन संस्था म्हणून मान्यता
Health Minister Rajesh Tope’s appreciation from MP Supriya Sule