आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली… धनंजय मुंडेंबाबत भलतचं काही तरी बोलून बसले
तानाजी सावंत यांनी टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला आहे. मुंडे यांनी शिंदे यांच्या चारित्र्यावरही टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होणार आहे.
बीड : भर सभेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant)यांची जीभ घसरली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर(Dhananjay Munde) टीका करताना तानाजी सावंत भलतचं काही तरी बोलून बसले आहेत. सावंत यांनी असभ्य भाषेचा वापर केला आहे. मुंडे यांनी शिंदे यांच्या चारित्र्यावरही टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होणार आहे.
आमच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला तर नागडा करून मारु असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केले आहे. बीडमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे वादग्रस्त वक्तव्य केले.
माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्र्यावर टीका करताल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही अशी टीका आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्र्यावर टीका करण्या अगोदर तुमचे चारित्र्य तपासा असं देखील सावंत यावेळी बोलताना म्हणाले.
मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या सरकारमुळेच रद्द झालं असा आरोप देखील सावंत यांनी केला आहे. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचं सावंत म्हणाले.
उद्धव ठाकरे आम्हाला म्हणतात की तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका यावर तानाजी सावंत यांनी पलटवार केला आहे. तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा थेट सवाल ठाकरे यांना केला आहे.
ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली असा खोचक टोला तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.