महाराष्ट्रात गोवरची साथ किती गंभीर? आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले….

गोवरमुळे आतापर्यंत 14 बालमृत्यू झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात गोवरची साथ किती गंभीर? आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले....
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 4:20 PM

मुंबईः महाराष्ट्रात गोवरची साथ कुठे कुठे पसरली आहे, याबद्दल महत्त्वाची माहिती आज आरोग्यमंत्री (Health minister) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिली. महाराष्ट्रात मुंबईत पहिल्यांदा या आजाराचे रुग्ण सापडले. त्यानंतर इतर जिल्ह्यात याचा प्रसार झाला. राज्यात 26 ठिकाणी गोवरचा (Govar) उद्रेक झाला असून सध्या राज्यातील गोवरच्या सक्रिय रुग्णांची संख्या 700 एवढी झाली आहे. मात्र राज्यभरात जवळपास 825 आरोग्य पथकांद्वारे गोवरची साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

आरोग्य मंत्र्यांनी आणखी काय सांगितलं?

  •  मुंबई, मालेगाव, भिवंडी, औरंगाबाद, सोलापूरमध्ये गोवरची साथ पसरत आहे. याची सुरुवात मुंबईत झाली.
  •  राज्यात 825 आरोग्य पथकांद्वारे गोवर प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच रुग्णांबाबत कशी काळजी घ्यायची, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे.
  •  काही आठवड्यांपूर्वी मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात 77 पेशंट होते. 10-12 रुग्ण गंभीर होते. मात्र आता रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण कमी आहे.
  •  गोवरमुळे आतापर्यंत 14 बालमृत्यू झाले. त्यापैकी एका बालकाचं लसीकरण झालं होतं. बाकीच्याचं लसीकरण झालं नव्हतं. 0 ते 11 महिने या वयोगटातील 12 ते 24 महिने 8 बालकांचा मृत्यू, 25 ते 60 महिने यात दोन बालकांचा मृत्यू झाला.
  •  मृत्यू झालेल्या या 14बालकांमध्ये बाकीचेही काही आजार असतील, त्याचा सविस्तर अहवाल सादर होईल. गोवर विरोधात प्रभावीपणे योजना राबवली जात आहे.
  • रुग्णांना वेळोवेळी अ जीवनसत्वाची मात्रा पुरवली जात आहे.  रुबेला पहिला डोस झालेल्यांची संख्या 8,654 एवढी आहे. तर रुबेला दुसरा डोस 6,620 एवढी आहे.
  •  ज्या बालकाला गोवरचा संसर्ग झाला आहे, त्याला 7 दिवस एकाच ठिकाणी ठेवणे. पूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्याला स्थलांतरास परवानगी देणे, अशा उपयायोजना सुरु आहेत.

 पाहा तानाजी सावंत काय म्हणाले?

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.