सोलापुरात शिवसेनेला जबरदस्त झटका; हजारो कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सामील

शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यातुन पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे.आमदार तानाजी सावंत यांचे मुळ गाव असलेल्या वाकाव गावात माढा, मोहोळ, पंढरपुर तालु्क्यासह कुडूवाडी शहरातील हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जयघोष करीत पाठिंबा दर्शवत त्यांच्या गटात प्रवेश केला आहे.यावेळी महिला शिवसैनिक देखील उपस्थित होत्या.

सोलापुरात शिवसेनेला जबरदस्त झटका; हजारो कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सामील
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 3:53 PM

सोलापुर :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी(Eknath Shinde ) बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत.दरम्यान ग्रामीण भागात देखील सेनेत दोन गट पहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. आमदार आणि खासदारांपाठोपाठ राज्यातील अनेक महापालिका तसेच नगपालिकांचे नगरसेवक शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यातच आता शिवसनेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिंदे गटाला पाठिंबा देताना दिसत आहेत. सोलापुरात देखील शिवसेनेला जबरदस्त झटका बसला आहे. हजारो कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.

शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यातुन पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे.आमदार तानाजी सावंत यांचे मुळ गाव असलेल्या वाकाव गावात माढा, मोहोळ, पंढरपुर तालु्क्यासह कुडूवाडी शहरातील हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जयघोष करीत पाठिंबा दर्शवत त्यांच्या गटात प्रवेश केला आहे.यावेळी महिला शिवसैनिक देखील उपस्थित होत्या.

आमदार तानाजी सावंत यांच्या वाकाव येथील निवासस्थानी शिंदे यांच्या गटात प्रवेशाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. येत्या काही दिवसांतच एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकत्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजीराव सावंत यांनी जाहीर केलं आहे.

राष्ट्रवादी व काँग्रेससह काडीमोड करुन हिंदुत्व अबाधित ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे नी घेतलेल्या निर्णयाने प्रभावित होऊनच आमदार तानाजी सावंत,शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात आल्याचे यावेळी शिवसैनिकांनी बोलताना सांगितले. पाठिंबा देऊन गटात प्रवेश केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्याचा शिवाजी सावंत यांच्याकडून सन्मान करण्यात आला.

यवतमाळमध्ये खासदार भावना गवळींचा शिवसेनेला धक्का, समर्थक नगरसेवक आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात

एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घ्यावे असा सल्ला पत्र लिहून देणाऱ्या वाशिम – यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhavna Gawali)यांचा गट आता अधिकृतरित्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde group)गटात सामील झालेला आहे. भावना गवळी समर्थक नगरसेवक पिंटू बांगर यांनी याची घोषणा आज केली. भावना गवळी यांच्या शिंदे गटासोबत जाण्याने यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. यात 8 नगरसेवक (corporators)आणि 30 पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते आहे. बाभूळगाव नगर पंचायतीचे नगरसेवक, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गटाचे निरीक्षक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याची घोषणा केली आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.