Natioanl Politics | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन त्यांची जागा घेऊ शकते. दिल्लीतील निवासस्थानी ईडीची धाड पडल्यानंतर हेमंत सोरेन गायब झाले होते. आज रांची येथील निवासस्थानी त्यांची पक्ष नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. या बैठकीला त्यांची पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित आहे. ईडीने त्यांच्या निवासस्थानाहून एक BMW कार आणि रोख रक्कम जप्त केलीय. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी हेमंत सोरेन यांच्याजागी त्यांची पत्नी कल्पना मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळेल असा दावा केला आहे.
हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन आमदार नाहीय. पण त्या बैठकीला हजर होत्या. कल्पना सोरेने मुख्यमंत्रीपद संभाळणार असं बोलल जातय. कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी जेएमएम आमदार सरफराज अहमद यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातून राजीनामा दिला आहे. अहमद गांडेय मतदारसंघातून तीनवेळा आमदार राहिले आहेत. दोनवेळा त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. 2019 विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चामध्ये प्रवेश केला.
कोण आहेत कल्पना?
कल्पना ओदिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात रहायच्या. हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गृह जिल्हा आहे. 43 वर्षीय कल्पना सोरेन यांच्याकडे एमबीए आणि इंजीनियरिंगची डिग्री आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, “कल्पना या चांगल्या शिकलेल्या असून त्यांच्यात आत्मविश्वास आहे. झामुमोमध्ये त्यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळेल. आत आणि बाहेर विरोध होणार नाही” त्यांचा इशारा हेमंत यांचे छोटे बंधु आमदार बसंत सोरेन यांच्याकडे होता.
जैविक शेती करुन शाळा चालवतात
कल्पना जैविक शेती करतात. शाळा चालवतात. काँग्रेसचे 17 आमदार आहेत. त्यांच्याकडे अंतर्गत विषय आहेत, त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दावा करणार नाहीत. दुसरा सहकारी पक्ष राजदकडे फक्त एक जागा आहे. अनेक बाबतीत हेमंत सोरेन कल्पना यांचा सल्ला घेतात. दिल्ली पोलिसांना चकमा देऊन हेमंत सोरेन रांचीमध्ये आले. त्यावेळी आमदारांच्या बैठकीला कल्पना सोरेन उपस्थित होत्या.