एकीकडे हिमाचलमध्ये भाजपचा सुपडासाफ, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या विजयाने दिलासा

भाजपच्या 'या' बड्या नेत्याचा विजय, भाजपला दिलासा...

एकीकडे हिमाचलमध्ये भाजपचा सुपडासाफ, भाजपच्या 'या' बड्या नेत्याच्या विजयाने दिलासा
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 12:27 PM

मुंबई : एकीकडे गुजरातमध्ये (Gujarat Assembly Election 2022 Results) भाजपला घवघवीत यश मिळत असताना हिमाचलमध्ये (Himachal Election 2022 Results) मात्र भाजपचा सुपडासाफ झालाय. हिमाचलच्या 68 जागांपैकी 39 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजपचे उमेदवार 26 जागांवर पुढे आहेत. आम आदमी पक्षाला तर आपलं खातंही खोलता आलेलं नाहीये. अपक्ष आणि इतर उमेदवारांना 3 जागांवर आघाडी आहे. अशात परिस्थितीत हिमाचलच्या बड्या नेत्याच्या विजयाने काँग्रेसला मात्र दिलासा मिळताना दिसतोय.

‘या’ भाजप नेत्याचा विजय

हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा विजय झाला आहे. जयराम ठाकूर 20 हजार मतांनी विजयी झाले आहेत. या राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटी-तटीचा सामना सुरु आहे. काँग्रेस 39 तर भाजप 26 जागांवर पुढे आहे. त्यामुळे या राज्यातील निकालाकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय.

मंत्री पिछाडीवर

हिमाचल प्रदेशात 11 पैकी 7 मंत्र्यांना विजयासाठी जंग जंग पछाडावं लागत आहे. या सातही मंत्र्यांच्या मतदारसंघात काँटे की टक्कर सुरू आहे. दोन मंत्र्यांचे मतदारसंघ यापूर्वीच बदलण्यात आले होते, तरीही त्यांना विजयासाठी झटावं लागत आहे.

मंत्र्याचा मतदारसंघ बदलला…

शहर विकासमंत्री सुरेश भारद्वाज यांना शिमला मतदारसंघाऐवजी कसुम्पटी मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. वनमंत्री राकेश पठानिया यांना कांगडा जिल्ह्यातील नुरपूर मतदारसंघा ऐवजी फतेहपूरमधून उमेदवारी देण्यात आली होती.हिमाचल प्रदेशात आतापर्यंत 45 ते 75 टक्के मंत्री निवडणुकीत पराभूत होण्याचा ट्रेंड राहिलेला आहे.

जरी काँग्रेस हिमाचल प्रदेशमध्ये जरी पुढे असेल तरी अद्याप निकाल स्पष्ट नाहीये. हे सुरुवातीचे कल आहेत. जोवर सगळ्या जागांचा निकाल समोर येत नाही, तोवर विजय कुणाचा यावर स्पष्टता नाहीये. पण काँग्रेस सध्याच्या कलांनुसार आघाडीवर आहे, हेच निश्चित आहे.

आपचं खातंही उघडलं नाही!

काल दिल्ली महापालिकेचा निकाल लागला. यात आपला घवघवीत यश मिळालं. त्यानंतर आज गुजरातमध्ये आप 8 जागांवर पुढे आहे. पण हिमाचलमध्ये पाहिलं असता ‘आप’ला एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही. त्यामुळे आपच्या डोळ्यात काल हसू तर आज आसू अशी स्थिती आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.