Hingoli : शिंदे गटाच्या शक्तिप्रदर्शनानंतर आता ठाकरे गटाचा महामेळावा, संतोष बांगरांना आव्हान देण्यासाठी सेनेचे खासदारही हिंगोलीत..!

कॉंग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांचा पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये सेनेत प्रवेश झाला होता. त्यानंतर लागलीच जिल्हाप्रमुख म्हणून विनायक भिसे, संदेश देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे संघटनात्मक बदल करुन हिंगोलीत शिवसेनेचे काम स्थानिक पातळीवर सुरु झाले आहे.

Hingoli : शिंदे गटाच्या शक्तिप्रदर्शनानंतर आता ठाकरे गटाचा महामेळावा, संतोष बांगरांना आव्हान देण्यासाठी सेनेचे खासदारही हिंगोलीत..!
आ. संतोष बांगर आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 3:57 PM

हिंगोली : (Rebel MLA) शिवसेनेतील बंडानंतर पश्चिम महाराष्ट्रात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आणि मराठवाड्यात (Santosh Bangar) संतोष बांगर हे कायम चर्चेत राहिलेले आहेत. या आमदारांनी केवळ पक्ष विरोधात भूमिकाच घेतली असे नाही तर पक्ष नेतृत्वावरही सवाल उपस्थित केले आहे. त्यामुळे (Shivsena) शिवसेनेकडूनही आता बंडखोर आमदारांचेच मतदारसंघ समोर ठेऊन रणनिती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून कॉंग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांचा सेनेत प्रवेश झाला आहे. तर प्रवेशानंतर लागलीच जिल्हा प्रमुखांची निवड झाली असून आता 12 सप्टेंबर रोजी सेनेचा महामेळावा होणार आहे. यापूर्वी आ. संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर आता सेनेचा मेळावा झाल्यावरच कोण कुणाला भारी याची समिकरणे जुळवली जातील.

शिवसेनेमध्ये फेरबदल

संतोष बांगर यांनी बंड केले तरी स्थानिक पातळीवर याचा काही परिणाम होणार नाही, हे दाखवून देण्यासाठी सेनेकडून सर्वतोपरी तयारी केली जात आहे. बांगरांना निवडणूकीत कडवे आव्हाने देणारे दोन्ही नेत्यांनी सेनेत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे जिल्हाप्रमुखांचीही नव्याने निवड करण्यात आली आहे. पक्षातील या बदलामुळे संतोष बांगर यांच्यासाठी हे एक आव्हानच राहणार असल्याचा सूर आहे.

आगोदर प्रवेश अन् नंतर संघटनात्म धोरण

कॉंग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांचा पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये सेनेत प्रवेश झाला होता. त्यानंतर लागलीच जिल्हाप्रमुख म्हणून विनायक भिसे, संदेश देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे संघटनात्मक बदल करुन हिंगोलीत शिवसेनेचे काम स्थानिक पातळीवर सुरु झाले आहे. त्यामुळे कोण सरस ठरणार हे तर आगामी काळातील निवडणूकांवर अवलंबून आहे.

अंतर्गत गटबाजीचा धोका कायम

पक्षाने जिल्हाप्रमुख पदी विनायक भिसे, संदेश देशमुख यांची निवड केली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर यांना विरोध होत असून आणखी एकाच्या गळ्यात जिल्हा प्रमुखाची माळ घालावी अशी मागणी शिसैनिकांनी केली आहे. शिवाय असे न झाल्यास आपण वेगळा विचार करणार असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे पक्ष संघटनेबरोबर अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. अन्यथा नाराजांना शिंदे गटाचे दरवाडे मोकळे आहेतच.

असा असणार सेनेचा महामेळावा

यापूर्वी आ. संतोष बांगर यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर आता पक्ष संघटनेच्या अनुशंगाने सेनेचा मेळावा 12 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. सकाळी 11:30 वाजता हा मेळावा असणार आहे. तर मेळाव्यात शिवसानिकांना मार्गदर्शन करण्यासाठी खा. विनायक राऊत हे उपस्थित असणार आहेत.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.