Hingoli | गद्दारांची पहिली गाडी फोडेल त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार, हिंगोलीत बबनराव थोरात यांच्या आवाहनाने खळबळ

माझी गाडी फोडणं तर सोडाच माझ्या गाडीला नुसतं टच जरी केलं तर आमदारकीचा राजीनामा देईल,अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली.

Hingoli | गद्दारांची पहिली गाडी फोडेल त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार, हिंगोलीत बबनराव थोरात यांच्या आवाहनाने खळबळ
बबनराव थोरात, हिंगोली शिवसेनाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 1:21 PM

हिंगोलीः गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल, असे आवाहन हिंगोली शिवसेनेचे नेते बबनराव थोरात (Babanrao Thorat) यांनी केलंय. आमदार आणि खासदारांच्या बंडामुळे विस्कळीत झालेल्या हिंगोली शिवसैनिकांमध्ये या वक्तव्याने खळबळ माजली आहे. हिंगोलीत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मूळ शिवसैनिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आमदार संतोष बांगर (Santosh Bangar), खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं केली. या वेळी नवं निर्वाचित हिंगोलीचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची आणि काँग्रेसमधून घरवापसी केलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. शिवसैनिकांनी जोरदार सत्कार केला. यावेळी हजारो शिवसैनिक महावीर भवन आयोजित सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी ज्यांना जिल्हाप्रमुख पद हवं त्यांनी गद्दारांच्या गाड्या फोडा त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार केला जाईल असं आवाहन करीत खळबळ उडवून दिली.

बंडखोरांना आव्हान

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर आमदार बांगर आणि खासदार हेमंत पाटलांना शिवसैनिकांनी चिथावणी दिली. संपर्क प्रमुखांनी गाड्या फोडण्याचे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी आमदार बांगर ,खासदार हेमंत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार गद्दार अश्या घोषणा दिल्या… संतोष बांगर आता माझ्या कानाखाली आवाज काढा …. एक वेळ नाही तर हजार वेळ गद्दार म्हणतो.. असे म्हणत संदेश देशमुख यांनी जोरदार घोषणा देत बांगर यांना आव्हान दिले.

आमदार संतोष बांगर यांचा पलटवार

दरम्यान, माझी गाडी फोडणं तर सोडाच माझ्या गाडीला नुसतं टच जरी केलं तर आमदारकीचा राजीनामा देईल,अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली. यावेळी संतोष बांगर यांनी बबनराव थोरात यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. बबन थोरात याने हिंगोली,बीड ,नांदेड आणि नंदुरबारच्या अनेकांकडून लाखो रुपये उकळलेत. त्यामुळे याला हिंगोलीच्या संपर्क पदावरून हटवलं होतं, हे उद्धव ठाकरे यांनासुद्धा माहिती आहे असं म्हटलं आहे.. आमच्या गाड्या तुम्ही काय फोडता, आमच्या गाड्या तुमच्या घरापुढे आणून उभ्या करतो.. स्पर्श जरी करून दाखवला तर हा संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही असे सनसनाटी वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.