संतोष बांगर यांच्यावर कारवाई होणार का? हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनीच सांगितलं…
संतोष बांगर यांच्याविरोधात सध्या विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. त्यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, ' मला वाटते त्याचं दूध का दूध झालं आहे.
रमेश चेंडके, हिंगोलीः हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर कॉलेजच्या प्रिन्सिपलला मारहाण केल्या प्रकरणी कारवाई होणार का, असा सवाल विचारला जात आहे. संतोष बांगर यांनी मारहाण केलेला व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आज प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic day) जिल्ह्यात उपस्थित होते. संतोष बांगर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. बांगर यांच्यावर कारवाई होणार का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्टच उत्तर दिलंय.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
अब्दुल सत्तार म्हणाले, ‘ जयंत पाटील यांनी कोणाचा राजीनामा मागितला मला माहिती नाही. मात्र या संदर्भात मी पोलिसांकडून माहिती घेतली. पोलिसांनी सांगितलं की त्यांच्याकडे कुठलीही तक्रार नाही.आत्ता तो व्हिडीओ कसा आहे काय आहे..? त्या प्रचार्याविरोधात महिलांनी माझ्याकडे येऊन तक्रार केलीये.
आमच्यावर आरोप प्रत्यारोप झाले आहेत. चौकशी करण्यचा आदेश जिल्हाधिकारी यांना दिला. त्याच्यावर जिल्हाधिकारी माहिती घेऊन कार्यवाही करतील. जोपर्यंत कुणी तक्रार करणार नाही तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा होत नाही.
राजकारणात ज्यांच्या खुर्च्या…
संतोष बांगर यांच्याविरोधात सध्या विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. त्यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, ‘ मला वाटते त्याचं दूध का दूध झालं आहे. राजकारणात ज्याच्या खुर्च्या गेल्या त्यांना त्रास जरूर होतो. ज्या वेळेस लोकप्रतिनिधी कडे तक्रारी येतात. तेथील परिस्थितीनुसार लोकप्रतिनिधींकडून चुका होतात. त्याच्यावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील.
काय आहे नेमकं प्रकरण?
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी तंत्रनिकेतनच्या प्राचार्यायाला मारहाण केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता या प्रकरणाला नवे वळण लागले असून तंत्रनिकेतनच्या महिला प्राध्यापकांचे प्राचार्यावर गंभीर आरोप केले आहेत..
आम्हीच आमदार संतोष बांगर यांना मोठ्या भावाप्रमाणे हा सगळा प्रकार सांगितला होता. म्हणून ते या कॉलेजमध्ये आले होते. महिलांची पिळवणूक करणाऱ्या प्राचार्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं अशी मागणी या प्राध्यापक महिलांनी केली आहे. यापूर्वी या महिला प्राध्यापकांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.