Santosh Bangar | उद्धव ठाकरेंसाठी अश्रू, मग शिंदेंच्या गोटात, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर प्रथमच माध्यमांसमोर मोकळे…
बहुमत चाचणीत शिंदेंच्या बाजूने मतदान केल्यानंतर संतोष बांगर हिंगोलीत आले. शिवसैनिकांनी त्यांचं तेवढ्याच थाटात स्वागत केलं. मात्र फार सेलिब्रेशन न करता बांगर यांनी कामाला सुरुवात केली. आज मात्र ते पत्रकारांसमोर मोकळेपणाने बोलले.
हिंगोलीः एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) अनेक आमदारांनी बंड पुकारल्यानंतर हिंगोलीत शिवसैनिकांची महारॅली काढत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आमदारांनी परत या, अशी आळवणी करणारे संतोष बांगर सर्वांनी पाहिले. एकनाथ शिंदेंच्या बहुमत चाचणीत तेच बांगर (MLA Santosh Bangar) पु्न्हा दिसले पण उद्धव ठाकरेंविरोधातील म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या गटात. आठच दिवसात असं काय घडलं की बांगर यांचं अचानक मतपरिवर्तन झालं, हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय. यावर संतोष बांगर यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी संवाद साधला. बहुमत चाचणीत शिंदेंच्या बाजूने मतदान केल्यानंतर संतोष बांगर हिंगोलीत आले. शिवसैनिकांनी त्यांचं तेवढ्याच थाटात स्वागत केलं. मात्र फार सेलिब्रेशन न करता बांगर यांनी कामाला सुरुवात केली. आज मात्र ते पत्रकारांसमोर मोकळेपणाने बोलले. त्यांना विचारण्यात आलेली प्रश्नोत्तरं खालील प्रमाणे-
अचानक निर्णय का बदलला?
उत्तर- महाराष्ट्रातला मी पहिला आमदार असेल की मला उद्धव साहेबांनी आदेश दिला की, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जा म्हणले.. मी जिल्ह्यात आल्यावर रडलो-भावनिक झालो.. पण मी संपूर्ण शिवसेनेच्या पद अधिकाऱ्यांना /कार्यकर्त्यांना विचारलं, त्या वेळेस सगळ्यांनी सांगितलं की साहेब शिवसेनेचा मुख्यमंत्री होत आहे.. बाळासाहेबाच्या मनातला मुख्यमंत्री व्हायला म्हणून तुम्ही तुमचं अमूल्य मत एकनाथ शिंदे यांना द्यावं.. म्हणून मी सर्व मतदारांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव, सगळ्याच्या मते निर्णय घेऊन एकनाथ शिंदे यांचे हात बळकट केले आहेत..
सुरक्षा का काढली?
उत्तर – मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकाला सुरक्षेची गरज नाही. माझी सिक्युरिटी मी स्वतः आहे. संपूर्ण शिवसैनिक माझी सिक्युरिटी आहे. जोपर्यंत शिवसैनिक संतोष बांगर यांच्यासोबत आहे, तोपर्यंत संतोष बांगरच्या केसालाही धक्का लागणार नाही. एवढी ताकद माझ्या शिवसैनिकांत आहे…
बाळासाहेबांनीही वरतून पुष्पवृष्टी केली असेल…
महाविकास आघाडीवर टीका करताना आमदार संतोष बांगर म्हणाले, महा आघाडीचे सरकार सर्व सामान्य शिवसैनिकांना सामान्य जनतेला/शेतकऱ्यांना मान्य नव्हते. हे निसर्गाचे नियम होते, जी निसर्ग युती होती. ती युती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची राहावी ही सर्वांची इच्छा होती. बाळासाहेब ठाकरे यांनाही या युतीचा आनंद झाला असेल त्यांनी वरतून पुष्पवृष्टी केली असेल, अशी भावना संतोष बांगर यांनी व्यक्त केली.
अजितदादांनी सर्वसामान्य आमदारांना काय दिले?
राष्ट्रवादीवर टीका करताना आमदार संतोष बांगर म्हणाले, ‘ बाळासाहेबांनी कधीच सांगितले नव्हते की, राष्ट्रवादी-कॉग्रेस सोबत बसा.. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक शिवसेना संपायला लागले होते. राष्ट्रवादीचे मेन मेन नेते आहेत, ते सांगत होते की नाही आम्हाला आमचे 100 प्लस करायचे. आम्हाला निधीच्या वाटपामध्ये सन्मानीय अजित दादा पवार यांनी सागितलं की, आम्ही कुणाला दोनशे कोटी दिले ,206 कोटी , 274 कोटी दिले,300 कोटी दिले.. मला अजित दादा यांना विचारायचे आहे की, माझ्यासारख्या सर्व सामान्य आमदारांना काय दिले? माझ्या मतदार संघातला आकडा जर अजित दादाने सांगितला तो जर आकडा पाच पन्नास पंचवीस कोटीच्या वर गेला तर हा संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा ठाम विश्वास आहे ,
तुम्हाला बंडखोर अस ही म्हंटल जातेय..?
आम्ही बंडखोर नव्हतोच.. बंडखोर कशाला म्हणतात? ज्यांनी पार्टी बदलली, झेंडा दुसरा घेतला, त्याला बंडखोर म्हणतात. आजही आम्ही भगव्याशी एकनिष्ठ आहोत. आजही आमच्या शिवरायांचा भगवा करकरीत असावा, ही आमची निष्ठा आहे. लोकांनी किती ही बंड म्हणले, भडवे म्हणले तरी आम्ही हे सहन करून घेणार नाही.. हिंगोली जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे खासदार शिवसेनेचा आहे. नगरसेवक, मार्केट कमिट्या येथे आहेत. येणाऱ्या काळात जिल्ह्यात सगळीकडे शिवसेचा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संतोष बांगर यांनी दिला.
उद्धव ठाकरे तुमचे नेते आहेत की नाही..?
उत्तर- आजही मला ठाकरे घराण्याबद्दल आदर आहे,फोटो दाखव बाळासाहेब ठाकरे हे माझ्या ह्रदयात आहेत म्हणून ठाकरे घराण्याबदल माझ प्रेम तितकच आहे आणि तितकेच राहील, एकनाथ शिंदे हे माझे गुरू आहेत. अनेक अडचणी, तडीपारीच्या अडचणी,अनेक भानगडी काही ही असेल ते भाईला रात्री दोन वाजता जरी फोन केला अर्ध्या रात्री फोन उचलून त्या अधिकाऱ्यांना सागायचे..
संजय राऊतांवर काय मत..?
चहा पेक्ष्या किटल्या गरम आहेत. तिथे सन्मानीय उद्धव साहेब ठाकरे यांना भेटायचे असेल तर साहेब मला भेटायचे ,पण बाकीचे जे चांडाळ चोपडे जे लोक आहेत, ते साहेबाला मिसगाईड करतात. साहेबाला कार्यकर्त्यांपासून दूर करतात. जे खरं आहे ते, हे चांडाळ चोपडे लोक सांगत नाहीत. उद्धव साहेबाना मला सांगायचे की, मी तुमचा आहे ,मी शिवसेनेचा आहे. हे सगळे लोक तुमच्यापासून बाजूला करा. निश्चितपणे आपण सगळे जण एकत्र येऊन या महाराष्ट्रावरती छत्रपती शिवरायांचा भगवा हा फडकविल्या शिवाय राहणार नाही..
तुम्ही अगोदर निर्णय घेतला असला तर तुम्हाला झाडी ,डोगर बघायला मिळाला असता..?
उत्तर- मी झाडी डोगर हॉटेल बघणार माणूस नव्हे. मी तळा-गाळातला शिवसैनिक आहे.