रिटर्नचं तिकीट काढून आलेल्या माणसाला रिटर्नच पाठवणार, हितेंद्र ठाकूरांचा प्रदीप शर्मांना टोला

वसई-विरारमधील राजकारण (Vasai Virar Politics) चांगलेच तापले आहे.

रिटर्नचं तिकीट काढून आलेल्या माणसाला रिटर्नच पाठवणार, हितेंद्र ठाकूरांचा प्रदीप शर्मांना टोला
Follow us
| Updated on: Oct 01, 2019 | 11:54 PM

पालघर: वसई-विरारमधील राजकारण (Vasai Virar Politics) चांगलेच तापले आहे. हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी मंगळवारी (1 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरुन ठाकूर (Hitendra Thakur and Dawood relation) यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मांना टोला लगावला आहे. त्यांनी शर्मा यांचं नाव न घेता तो माणूस रिटर्नचं तिकीट काढून आलाय, रिटर्नच पाठवणार असं मत व्यक्त केलं.

मागील 30 वर्षांपासून एकहाती वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना शिवसेनेने आव्हान दिले आहे. शिवसेनेने ठाकूर यांच्याविरोधात इन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढाई चुरशीची होणार अशीच दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले, “आम्ही दाऊदशी दोन हात केलेले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीतही लढू. विरारचा विकास थांबला आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवा नालासोपारा घडवण्यासाठी आलो आहे.”

बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी वसईचे चिमाजी आप्पा मैदान, पार नाका, झेंडा बाजार वसई तहसीलपर्यंत रॅली काढून वसईच्या प्रांत कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात महिला, पुरुष, तरुण, जेष्ठ नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.

यावेळी ठाकूर यांनी 100 टक्के मीच निवडून येणार, असा विश्वास व्यक्त केला. तसेच कोणत्याही विरोधकांवर बोलणार नसल्याचं सांगितलं. मंगळवारी वसई विधानसभा मतदारसंघासाठी 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हे पाचही उमेदवारी अर्ज बहुजन विकास आघाडीचेच आहेत.

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः 3 अर्ज भरले. यात ठाकूर यांची पत्नी प्रविणा हितेंद्र ठाकूर आणि मुलगा आणि नालासोपाराचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांच्या अर्जाचाही समावेश आहे. ऐन वेळी हितेंद्र ठाकूर कुणाचा अर्ज ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.