‘महापालिका आणि पोलिसांवर होर्डिंग्स काढण्याची जबाबदारी झटकून चालणार नाही’, अजितदादांना भाजपचं प्रत्युत्तर

महापालिका आणि पोलिसांवर होर्डिंग काढण्याची जबाबदारी झटकून चालणार नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसनंच काढायला हवे, असं भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी म्हटलंय.

'महापालिका आणि पोलिसांवर होर्डिंग्स काढण्याची जबाबदारी झटकून चालणार नाही', अजितदादांना भाजपचं प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 5:35 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स जागोजागी लागले आहेत. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असणाऱ्या लोकांनीही अजित पवारांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावले आहेत. याबाबत विचारलं असता अजित पवार पत्रकारांवरच भडकल्याचं पाहायला मिळालं. गुन्हेगारांना मी होर्डिंग्स लावायला सांगितल्या होत्या का? असा उलट सवाल त्यांनी केला. त्यावर आता भाजपने अजित पवार यांना प्रत्यु्त्तर दिलं आहे. महापालिका आणि पोलिसांवर होर्डिंग काढण्याची जबाबदारी झटकून चालणार नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसनंच काढायला हवे, असं भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी म्हटलंय. (BJP’s Pune city president Jagdish Mulik criticizes Ajit Pawar over hoardings)

अजित पवारांचे गुन्हेगारांसोबत जे होर्डिंग्स लागले आहेत ते काढण्याची जबाबदारीही राष्ट्रवादीचीच आहे. त्यामुळे ते होर्डिंग्स त्यांनीच काढावेत. महापालिका आणि पोलिसांवर होर्डिंग्स काढण्याची जबाबदारी झटकून चालणार नाही. ते राष्ट्रवादीने काढले पाहिजेत असं मुळीक म्हणाले. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपनं लावलेल्या होर्डिंग्सवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. त्यावर मुळीक यांनी मिटकरींनाही प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल मिटकरी यांची देवेंद्र फढणवीस यांच्यावर बोलण्याची योग्यता नाही. देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे आणि राज्याचे विकासपुरुष आहेत. मिटकरी यांच्या पक्षाचे जे होर्डिंग लागले आहेत त्यावर किती गुन्हेगार आहेत हे आधी त्यांनी तपासावं, असं उत्तर मुळीक यांनी दिलं आहे.

होर्डिंग्सबाबत अजित पवार काय म्हणाले?

पिंपरी-चिंचवडमध्ये मी आज येत नाही महाराज, मी अनेक वर्षांपासून येतो. पिंपरी चिंचडवकरांना माझी सर्व मते स्पष्टपणे माहीत आहेत. तुम्ही काही तरी नवी गोष्ट काढण्यासाठी कोणता तरी मुद्दा सोडायचा आणि प्रश्न विचारायचे हे धंदे बंद करा, असा दम भरतानाच अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितलं नाही. एक मिनिट… मी नियमांचं पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीची लागले असेल तर भाजपची सत्ता आहे. आयुक्त महापौरांनी किंवा शहराचं कामकाज ज्यांच्या हातात आहे, त्यांनी त्यावर कारवाई करावी, असं अजितदादा म्हणाले.

संबंधित बातम्या :

राज्यात इलेक्ट्रीक गाडयांच्या वापराला प्रोत्साहन व प्राधान्य देणार: अजित पवार

गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का?; अजितदादा जेव्हा भडकतात…

BJP’s Pune city president Jagdish Mulik criticizes Ajit Pawar over hoardings

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.