अमित शाहांचा बेळगाव दौरा, महाराष्ट्र एकीकरण समितीला भेटण्यास नकार

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह बेळगाव दौरा करत असल्याची माहिती मिळत आहे. (Home Minister Amit Shah to Visit Belgaum)

अमित शाहांचा बेळगाव दौरा, महाराष्ट्र एकीकरण समितीला भेटण्यास नकार
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
| Updated on: Jan 16, 2021 | 10:22 PM

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या (17 जानेवारी) बेळगाव दौरा करणार आहेत. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह बेळगाव दौरा करत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या दौऱ्यानिमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांच्या भेटीची मागणी केली होती. मात्र अमित शाहांनी ही भेट नाकारली आहे. (Home Minister Amit Shah to Visit Belgaum)

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांकडे भेटीसाठीची मागणी केली होती. मात्र अमित शाहांनी ही भेट नाकारली आहे.

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी 17 जानेवारी 1956 रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 17 जानेवारीला हुतात्मा दिन पाळला जातो. या पार्श्वभूमीवर उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांची भेट मागितली होती. ही भेट महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून मागितली होती.

गृहमंत्री अमित शाह आज आणि उद्या दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर आहेत. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह बेळगाव दौरा करणार आहेत. या ठिकाणी जनसेवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अमित शाह उपस्थिती असेल. या कार्यक्रमाला दोन लाखांहून अधिक कार्यकर्ते सहभागी असतील, अशी माहिती समोर येत आहे.

या कार्यक्रमासाठी बेळगावच्या जिल्हा क्रिडांगणावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी एक लाखांहून अधिक लोकांच्या बसण्याची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण शहरात अमित शाहांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. (Home Minister Amit Shah to Visit Belgaum)

संबंधित बातम्या :

बेळगावसाठी 70 हजार पानांचे पुरावे तयार, एन. डी. पाटलांनी रुग्णालयातूनच येडीयुरप्पांना ठणकावलं

अमित शाहांची खिल्ली उडवली, कॉमेडियन थेट पोलीस ठाण्यात